RRB Recruitment 2025 : रेल्वे भरती मंडळाने RRB भरती २०२५ अंतर्गत १०३६ पदांसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख वाढवली आहे. आता उमेदवार १६ फेब्रुवारी २०२५ पर्यंत अर्ज करू शकतात. यापूर्वी ही तारीख ६ फेब्रुवारी २०२५ निश्चित करण्यात आली होती. रेल्वे भरती मंडळाने उमेदवारांच्या सोयीचा विचार करून हा निर्णय घेतला आहे. अधिकृत जाहिराती नुसार, उमेदवारांना १८ फेब्रुवारीपर्यंत फी भरण्याची परवानगी असेल आणि २८ फेब्रुवारी २०२५ पर्यंत ते त्यांच्या अर्जात बदल करू शकतात.
RRB Recruitment 2025
RRB Recruitment 2025 : ही पदे भरली जातील
पीजीटी (पदव्युत्तर शिक्षक)
टीजीटी (प्रशिक्षित पदवीधर शिक्षक)
पीआरटी (प्राथमिक शिक्षक)
संगीत शिक्षक
महिला कनिष्ठ शाळेतील शिक्षिका
महिला सहाय्यक शिक्षिका (प्राथमिक शाळा)
प्रयोगशाळा सहाय्यक
ग्रंथपाल
कनिष्ठ अनुवादक (हिंदी)
या आहेत महत्त्वाच्या तारखा
अर्ज सुरू होण्याची तारीख: ७ जानेवारी २०२५
अर्ज करण्याची शेवटची तारीख: १६ फेब्रुवारी २०२५
शुल्क भरण्याची शेवटची तारीख: १८ फेब्रुवारी २०२५
दुरुस्ती अर्ज करण्याची शेवटची तारीख: २८ फेब्रुवारी २०२५
परीक्षेची पद्धत: संगणक आधारित चाचणी (CBT)
RRB Recruitment 2025 आवश्यक शैक्षणिक पात्रता
अधिकृत जाहिराती नुसार, पदव्युत्तर, पदवीधर आणि १२ वी उत्तीर्ण उमेदवार अर्ज करू शकतात. काही पदांसाठी विशेष डिप्लोमा किंवा पदवी आवश्यक असू शकते.
वयोमर्यादा
अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे किमान वय १८ वर्षे निश्चित करण्यात आले आहे. तर अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे कमाल वय ४८ वर्षे निश्चित करण्यात आले आहे.
निवड प्रक्रिया
लेखी परीक्षा
शारीरिक चाचणी
कागदपत्र पडताळणी
वैद्यकीय चाचणी
आरआरबी भरती २०२५: परीक्षा नमुना २०२५
सीबीटी परीक्षा ९० मिनिटांची असेल, ज्यामध्ये एकूण १०० बहुपर्यायी प्रश्न असतील. यामध्ये व्यावसायिक क्षमता, सामान्य जागरूकता, सामान्य बुद्धिमत्ता आणि तर्क, गणित आणि सामान्य विज्ञानाशी संबंधित प्रश्न विचारले जातील. प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी १/३ गुण वजा केले जातील.
अर्ज प्रक्रिया काय आहे?
पायरी १: सर्व प्रथम उमेदवारांनी अधिकृत वेबसाइट rrbcdg.gov.in ला भेट द्या.
पायरी २: त्यानंतर उमेदवारांनी RRB रेल्वे भरती २०२५ च्या लिंकवर क्लिक करावे.
पायरी ३: त्यानंतर उमेदवारांनी त्यांच्या शैक्षणिक पात्रता आणि वयानुसार पद निवडावे.
पायरी ४: ऑनलाइन अर्ज भरा आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
पायरी ५: यानंतर उमेदवारांनी अर्ज शुल्क जमा करावे.
पायरी ६: आता उमेदवारांनी अर्ज सादर करावा.
पायरी ७: यानंतर उमेदवारांनी अर्ज फॉर्म डाउनलोड करावा.
पायरी ८: शेवटी, उमेदवारांनी अर्ज प्रिंटआउट घ्यावा.
महत्त्वाच्या लिंक्स
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |