Daily UpdateResult

Vanrakshak Bharti Result 2024 Merit List 🚨 ; वनरक्षक फायनल मेरिट लिस्ट पहा!

Vanrakshak Bharti Result 2024

Vanrakshak Bharti Result 2024 : अखेर सर्व भावी वनरक्षकांची प्रतीक्षा आता संपताना दिसत आहे. महाराष्ट्र वन विभाग अंतर्गत विविध पद भरतीची जाहिरात जून महिन्यात प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यानुसार 10 जून पासून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले. अंतिम तारखेपर्यंत वनरक्षक पदासाठी जवळपास 4,51,000 अर्ज आले. वनरक्षक पदांची उपलब्धता केवळ 2138 इतकीच आहे. दिनांक 31 जुलै पासून वनविभागाच्या विविध पदांची ऑनलाईन पद्धतीने परीक्षा झाली. परीक्षा टीसीएस कंपनी मार्फत घेण्यात आली. त्यांनतर सध्या भरती प्रक्रियेतील अंतिम टप्पा पार पडत आहे. कागदपत्र पडताळणी/ शारीरिक मोजमाप तसेच धाव चाचणी सर्व वन वृत्तामध्ये घेतले जात आहे. ही उमेदवारांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे की भरती प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात आली आहे.

Forest Guard Bharti Cut Off List 2024
Forest Guard bharti in final stage 2024 | वनरक्षक भरती अंतिम टप्प्यात..

वनविभागाला सदर भरती प्रक्रिया लवकर पार पाडायची असल्याने ते त्यासाठी पूर्ण प्रयत्न करत आहेत. आधी कागदपत्र पडताळणी/ शारीरिक मोजमाप साठी दिलेल्या वेळापत्रकात वेळोवेळी बदल करून शक्य होईल तितक्या लवकर प्रक्रिया पाडली जात आहे. तरी उमेदवारांनी अधिकृत संकेस्थळावर वेळोवेळी भेट देऊन कागदपत्र पडताळणी शारीरिक/मोजमाप वेळापत्रक पाहून सर्व कागदपत्रांसह दिलेल्या ठिकाणी उपस्थित राहावे. त्यांनतर लगेच धाव चाचणी साठी वेळापत्रक प्रसिद्ध केले जात आहे. त्यानुसार धाव चाचणी साठी उपस्थित राहायचे आहे. अमरावती वन वृत्तातील भरती प्रक्रिया सर्वात आधी पूर्ण झाली आहे.

Vanrakshak Bharti Cut Off List 2024 | वनरक्षक भरती कट ऑफ लिस्ट 2024

अमरावती वनरक्षक भरती अंतिम कट ऑफ लिस्ट जाहीर झाली आहे. अमरावती सोबतच इतर ठिकाणची सुध्दा धाव चाचणी पार पडली आहे. आता फायनल कट ऑफ ची आतुरता उमेदवारांना लागली आहे. खाली अमरावती मेरिट लिस्ट देत आहोत. तसेच नाशिक, नागपूर, कोल्हापूर, पुणे, धुळे, संभाजीनगर, यवतमाळ, अमरावती, गडचिरोली, चंद्रपूर, ठाणे वन वृत्ताचा अंतिम निकाल लागता क्षणी Megabharti.in वर मेरिट लिस्ट याच पोस्ट मध्ये अपडेट करणार आहोत. तेव्हा वेळोवेळी मेगाभरती ला भेट देत रहा.

वनविभाग/ वनवृत्त 🌳वनरक्षक मेरिट लिस्ट 🚨
अमरावतीPdf 📑
नाशिकPdf 📑
नागपूरPdf 📑
कोल्हापूरPdf 📑
धुळेPdf 📑
पुणेPdf 📑
संभाजीनगरPdf 📑
यवतमाळPdf 📑
गडचिरोलीPdf 📑
चंद्रपूरPdf 📑
ठाणेPdf 📑

Vanrakshak Final Selection List 2024 | वनरक्षक अंतिम निवड सूची 2024 🚨

वरील तक्त्यात आपल्याला कॉमन मेरिट लिस्ट pdf पाहायला मिळेल. तसेच अंतिम निवड सूची (Final Selection List) पाहण्यासाठी खाली अधिकृत संकेतस्थळाची लिंक देत आहोत. खाली दिलेल्या लिंकवर क्लिक केल्यानंतर सर्वात वरील तक्त्यात आपल्याला अंतिम निवड सूची (Final Selection List) दिसेल.

वनरक्षक अंतिम निवड सूची
पाहण्यासाठी अधिकृत संकेतस्थळ 🖇️
येथे पहा अंतिम निवड सूची ✅
——————————–
View Final Selection List ✅
Vanrakshak Bharti Result FAQ | वनरक्षक भरती निकालासंदर्भातील विचारले जाणारे प्रश्न
•वनरक्षक कागदपत्र पडताळणी वेळी फिटनेस सर्टिफिकेट आवश्यक आहे का?

कागदपत्र पडताळणी वेळी फिटनेस सर्टिफिकेट आवश्यक नाही. परंतु धावचाचणी वेळी आवश्यकच आहे. त्यामुळे सर्व उमेदवारांनी काढून घ्या.

•वनरक्षक कागदपत्र पडताळणी (Document Verification) साठी कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत?
Vanrakshak Document List
•माझ्याकडे ऑनलाईन परीक्षेचे प्रवेशपत्र किंवा अर्ज प्रिंट नाहीये काय करू?

वन विभागाने अर्ज प्रिंट काढता यावी यासाठी पुन्हा एकदा लिंक उपलब्ध करून दिली आहे. खालील लिंकवर क्लिक करून अर्ज प्रिंट काढून घ्या लिंक – येथे क्लिक करा 🖇️

•महाराष्ट्र वनरक्षक फायनल कट ऑफ किती लागेल?

महाराष्ट्र वनरक्षक फायनल कट ऑफ विभागानुसार वेगवेगळा लागू शकतो. तरी पुरुष उमेदवार 150+ कट ऑफ लागू शकतो. तसेच महिला उमेदवार 140+ लागू शकतो. यात प्रवर्गानुसार थोडाफार बदल होऊ शकतो.

वनरक्षक ला वेतन किती असते?

वनरक्षक ला २१,७००-६९,१०० + महागाई भत्ता असे वेतन असते.

तसेच आणखी काही प्रश्न असतील तर खाली दिलेल्या लिंकवर वर क्लिक करून मॅसेज स्वरूपात विचारू शकता MegaBharti व्हॉट्सॲप/ टेलिग्राम ग्रुप/ चॅनल जॉईन करा अन मिळवा सरकारी आणि खाजगी नोकरीचे मोफत अपडेट्स तेही अगदी वेळेवर. गुगलवर Megabharti.in सर्च करून लेटेस्ट भरती अपडेट्स मिळवू शकता 🔎

Homepage -होमपेज
लेटेस्ट भरती अपडेट पहा 📌
Join us on WhatsApp
लगेच जॉईन करा 🟢
Join us on Telegram
लगेच जॉईन करा 🔵
इतर महत्त्वाच्या भरती..

आयकर विभाग मुंबई नवीन भरती 🔔

सेंट्रल बँक ‘सफाई कर्मचारी’ भरती 🔔

लेटेस्ट पोलीस भरती अभ्यासक्रम pdf 🔔

🎓𝙍𝙚𝙡𝙞𝙖𝙗𝙡𝙚 𝙅𝙤𝙗 𝙐𝙥𝙙𝙖𝙩𝙚𝙨 म्हणजे 𝙈𝙚𝙜𝙖𝘽𝙝𝙖𝙧𝙩𝙞.𝙞𝙣 🔎