पुण्यात आरोग्य विभागामार्फत 800 पदे भरण्यास मंजुरी
Pune Arogya Vibhag Bharti 2022
Pune Arogya Vibhag Bharti 2022 : पुणे जिल्ह्यात आरोग्य विभागामार्फत एकूण 801 पदांसाठी भरती होणार आहे. पुण्यातील जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागामार्फत विविध संवर्गातील रिक्त पदे भरली जाणार आहेत.
जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागात एकूण 859 रिक्त पदे आहेत. त्यापैकी 801 रिक्त पदे भरण्यास राज्य सरकारने परवानगी दिली आहे.

राज्य सरकारने कधी परवानगी दिली ?
पुणे जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभाग भरतीला शुक्रवार दि.21 रोजी राज्य सरकारने परवानगी दिली.
आरोग्य विभाग भरतीची 2019 मध्ये जाहिरात प्रसिद्ध झाली होती. मात्र प्रत्यक्षात भरती झालीच नाही. काही कारणास्तव भरती रद्द झाली होती. त्यांनतर आता राज्य सरकारने पुणे जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभाग भरतीचा मार्ग मोकळा केला आहे.
कोणती पदे भरली जाणार आहेत ?
- आरोग्य सेवक
- आरोग्य सेविका
- औषध निर्माता
- प्रयोगशाळा तंत्रज्ञ
- आरोग्य पर्यवेक्षक
- अशा विविध पदांची भरती केली जाईल. एकूण 12 संवर्गा पैकी 5 संवर्गातील रिक्त पदांची भरती या भरतीत केली जाणार आहे.
जाहिरात कधी प्रसिद्ध करण्यात येईल ?
- शहरातल्या आरोग्य विभाग भरतीची जाहिरात येत्या महिन्यात प्रसिद्ध करण्यात येईल असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.
कोण काय म्हणाले ?
- जिल्हा आरोग्य विभाग अधिकारी डॉ.भगवान पवार म्हणाले की..
- आरोग्य विभागात विविध पदांचे 12 संवर्ग आहेत. कोण कोणत्या पदांचा त्यात समावेश आहे तेही सांगितले.
- संबंधीत रिक्त पदे भरण्याचा अधिकार जिल्हा परिषदेला देण्यात आलेला आहे.
- या भरतीसाठी जिल्हास्तर निवड समिती स्थापन करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
- 2019 मध्ये ही भरती रद्द झाली होती.
पुण्यातील आरोग्य विभागात काम करण्याची संधी तरुणांना मिळणार आहे. जिल्हा परिषदेच्या मार्फत ही भरती होणार आहे. अनेकजण या भरतीची वाट पाहत होते. त्यांचे आरोग्य विभागात काम करण्याचे स्वप्न पूर्ण होणार आहे.
- शैक्षणिक पात्रता ?
- वेतनमान किती ?
- वयोमर्यादा किती ?
- अश्या अनेक प्रश्नांची उत्तरे जाहिरात प्रसिद्ध झाल्यावर आपल्याला मिळतील. भरती संबधीत पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळवण्यासाठी आपला व्हॉट्सॲप ग्रुप नक्की जॉईन करा. कारण करिअर सर्वात महत्वाचं आहे !
खाली दिलेल्या लिंकवर/फोटोवर क्लिक करून करून मेगाभरती व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा अन मिळवा सरकारी आणि खाजगी नोकरीचे मोफत अपडेट्स डेली अपडेट्स तेही अगदी वेळेवर.
