महाराष्ट्र मेगा पोलीस भरती 09 तारखेपासून अर्ज सुरू होणार !
Police Bharti Update 2022 : मागच्या एक दोन महिन्यापासून पोलीस भरतीची चर्चा सर्वत्र सुरू आहे. दोन वर्ष कोरोनाच्या कारणामुळे भरती होऊ शकली नाही. त्यानंतर मागील आठवड्यात रिक्त पदांची संख्या आणि भरतीचा जीआर प्रसिद्ध करण्यात आला होता. नंतर प्रशासकीय कारण देत स्थगिती देण्यात आली. आता सर्व प्रकारे पोलीस भरतीसाठी मार्ग मोकळा झाला आहे.
Police Bharti Update 2022 ची नवीन प्रत प्रकाशित करण्यात आली आहे. आपल्या वेबसाईटवर आम्ही आपल्याला आधीच होणारे संभाव्य बदल सांगितले होते. अगदी तेच बदल नवीन नियम प्रत मध्ये दिले आहेत. आपल्याला सूत्रांकडून मिळत असलेली सर्व माहिती तपासून अभ्यास करूनच आपल्यापर्यंत पोहोचवली जाते. तुमचा विश्वास हीच आमची कमाई आहे. त्यामुळे आपल्या मेगाभरती वेबसाईटला भेट देत रहा.

- मेगा पोलीस भरतीमध्ये एकूण किती जागा भरल्या जाणार आहेत ?
- मोठ्या पोलीस भरती मध्ये एकूण 17,130 जागा भरल्या जाणार आहेत.
- कोणत्या पदासाठी किती जागा ?
- कॉन्स्टेबल – 14,956 जागा
- कॉन्स्टेबल ड्रायव्हर – 2,174 जागा
- शैक्षणिक पात्रता काय असेल ?
- कॉन्स्टेबल – 12वी पास किंवा समतुल्य इतर
- कॉन्स्टेबल ड्रायव्हर – 12वी पास किंवा ड्रायव्हिंग लायसन्स
- वयोमर्यादा किती असेल ?
- 18 ते 28 वर्षांपर्यंत
- भरती प्रक्रिया कशी होईल ?
- शारीरिक चाचणी – 50 गुण
- ऑनलाईन कॉम्प्युटर साहाय्याने MCQ पद्धतीची परीक्षा. ज्यामध्ये 100 पैकी 40 गुण मिळवणे आवश्यक आहे.
- मेगा पोलीस भरती अर्ज कधीपासून सुरू होणार ?
- दिनांक 09-नोव्हेंबर-2022 रोजी अधिकृत जाहिरात प्रसिद्ध केली जाईल आणि लगेच भरती अर्ज सुरू होईल.

- भरतीसाठी वयोमर्यादा किती वाढवणार ?
- कोरोनामुळे 2 वर्ष तयारी करत असलेल्या उमेदवारांची वयोमर्यादा संपली. खास त्यांच्यासाठी दोन वर्षांनी वयोमर्यादा वाढवली आहे.
Mega Police Bharti Update 2022 भरती प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे. त्यामुळे तयारी करणाऱ्या भावी पोलिसांसाठी ही आनंदाची बातमी मानली जात आहे. ज्या इच्छुक उमेदवारांचे कोरोना मुळे दोन वर्ष वाया गेले त्यांनाही या भरतीमध्ये संधी दिली जात आहे. ही विशेष बाब आहे. सरकारने त्यांच्यावर अन्याय होऊ नये यासाठी प्रयत्न केले आहेत. वयोमर्यादा संपली म्हणून निराश झालेले तरुण आता पुन्हा एकदा जोरदार तयारी करत आहेत. मेहनत करण्याऱ्या उमेदवारांना नक्की खाकी वर्दी मिळेल यात काही शंका नाही.
मेगा पोलीस भरती प्रक्रिया संदर्भात अजून काही नवीन अपडेट्स आल्या तर आम्ही आपल्यापर्यंत सर्वात आधी पोहोचवण्याचा प्रयत्न करू. नवीन अधिकृत जाहिरातीची प्रतीक्षा राज्यातील सर्व इच्छुक करत आहेत.

इतर महत्त्वाच्या भरती..
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ मार्फत लातूर मध्ये भरती ✓