पोलीस भरतीची नवी जाहिरात “या” दिवशी येणार सरकारचा ग्रीन सिग्नल मिळाला
Police Bharti Update 2022 |Maharashtra Police Bharti update 2022
Police Bharti Update 2022 : मागील एक महिन्यापासून पोलीस भरतीची चर्चा सर्वत्र सुरू आहे. दोन वर्ष कोरोनाच्या कारणामुळे भरती होऊ शकली नाही. त्यानंतर मागील आठवड्यात रिक्त पदांची संख्या आणि भरतीचा जीआर प्रसिद्ध करण्यात आला होता.
अचानक एक प्रत व्हायरल झाली अन महाराष्ट्रभर खळबळ उडाली. तब्बल 14 हजार पेक्षा जास्त पोलीस भरतीची प्रक्रिया स्थगित करण्यात आली. प्रशासकीय कारण देत भरती टाळल्याने पात्र उमेदवारांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले.

त्यानंतर आता मिळत असलेल्या माहितीनुसार स्थगित झालेली पोलीस भरती लवकरच सुरू होणार आहे असे कळते.
- भरतीला का स्थगिती देण्यात आली होती ?
- प्रशासकीय कारण देत भरती स्थगित करण्यात आली होती.
- सरकार भरतीबाबत काय करणार आहे ?
- सूत्रांकडून मिळत असलेल्या माहितीनुसार राज्य सरकार पोलीस भरतीसाठी वयोमर्यादा वाढवणार आहे. कोरोना मुळे दोन वर्ष वाया गेले आणि वय आता भरतीसाठी बसत नाही. अश्या उमेदवारांसाठी सरकार विचार करत आहे. कोरोनाचा असर त्यांच्या मेहनतीवर पडू नये. त्यांच्यावर अन्याय होऊ नये, यासाठी सरकार वयोमर्यादा वाढवणार आहे.
- वयोमर्यादा किती वाढवणार ?
- कोरोनामुळे 2 वर्ष तयारी करत असलेल्या उमेदवारांची वयोमर्यादा संपली. खास त्यांच्यासाठी दोन ते तीन वर्षांनी वयोमर्यादा वाढवली जाणार आहे.
- स्थगित झालेली भरती प्रक्रिया कधी सुरू होणार ?
- स्थगित झालेली पोलीस भरती नोव्हेंबर च्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवडयात सुरू होणार असल्याचे कळते आहे.
- स्थगित झालेल्या भरतीत कोणते बदल होऊ शकतात ?
- जातीनिहाय विश्लेषण करून जागा भरण्यात येतील
- महाराष्ट्रातील तमाम तरुणांना या भरतीत सहभागी होता यावं यासाठी प्रयत्न केले जातील.
- दोन वर्ष भरतीची वाट पाहून वयोमर्यादा संपलेल्या उमेदवारांचा विचार केला जाईल.
- भरती मध्ये कोणत्याही समाजावर अन्याय होऊ नये म्हणून प्रयत्न केले जातील. विशेष म्हणजे मराठा आरक्षण रद्द झाल्यामुळे समाजातील तरुणांवर अन्याय होऊ नये यासाठी प्रयत्न केले जातील.
- मोठी भरती असल्याने नियम अटी मध्ये थोडा बदल केला जाईल.
- स्थगित झालेली भरती लवकरच जीआर प्रसिद्ध करून सुरू केली जाईल.

मेगा पोलीस भरती प्रक्रिया संदर्भात अजून काही नवीन अपडेट्स आल्या तर आम्ही आपल्यापर्यंत सर्वात आधी पोहोचवण्याचा प्रयत्न करू. नवीन अधिकृत जाहिरातीची प्रतीक्षा राज्यातील सर्व इच्छुक करत आहेत.
खाली दिलेल्या लिंकवर/फोटोवर क्लिक करून करून मेगाभरती व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा अन मिळवा सरकारी आणि खाजगी नोकरीचे मोफत अपडेट्स डेली अपडेट्स तेही अगदी वेळेवर.

SSC GD कॉन्स्टेबल पदाच्या तब्बल 24,000+ जागांसाठी भरती सुरू लवकर अर्ज करा ✓