Daily UpdatePolice Bharti

असे कराल तर पोलीस भरती प्रक्रियेमधून क्षणात बाद केले जाईल

Police Bharti Update 2022

Police Bharti Update 2022 : राज्यभरात जिल्हानिहाय भरती प्रक्रिया दिनांक 09-नोव्हेंबर-2022 पासून सुरू होईल. पोलीस भरतीबाबत अनेक महत्त्वाचे अपडेट्स आता समोर येत आहेत. ज्यामध्ये शासकीय कारणास्तव भरती स्थगिती असेल किंवा वयोमर्यादा वाढवली गेली त्याबद्दल इतर अनेक महत्त्वाच्या अपडेट्स आम्ही आपल्या पर्यंत अगदी वेळेवर पोहोचवत आहोत. आता मिळत असलेल्या माहितीनुसार एक महत्त्वाची सूचना सर्व उमेदवारांसाठी आहे.

Police Bharti Update 2022

काय केल्यास पोलीस भरती प्रक्रियेमध्ये बाद केले जाईल ?

व्हायरल होत असलेल्या प्रत नुसार उमेदवार ऑनलाईन अर्ज भरताना फक्त एकाच पदासाठी अर्ज करू शकतो. एकापेक्षा जास्त अर्ज केल्यास पोलीस भरती प्रक्रियेमध्ये कुठेही आपणास तात्काळ बाद केले जाईल. कोणत्याही जिल्ह्यात फक्त एकाच पदासाठी अर्ज करावा तरच आपण पुढील प्रक्रियेसाठी पात्र असाल याची नोंद उमेदवाराने घेणे गरजेचे आहे. भरतीची तयारी करत असलेल्या आपल्या मित्रांसोबत प्रियाजनांसोबत ही अपडेट नक्की शेयर करा.

Police Bharti Update 2022

अनेकजण ही चूक करतात. इथे नाही तिथे भरती होऊन जाऊ असा अनेकांचा समज असतो. आता अशा उमेदवारांनी सावध होणे गरजेचे आहे. कारण एक चूक आपण वर्षानुवर्षे केलेल्या मेहनतीवर पाणी फिरवू शकते. तसेच ऑनलाईन अर्ज भरताना अशी सर्व माहिती तपासून घ्यावी नियम अटी वाचाव्यात. एखाद्या चुकीमुळे आपला फॉर्म रिजेक्ट केला जाऊ शकतो.

ज्या उमेदवारांचे वय कोरोनामुळे संपुष्टात आले होते. त्यांच्यासाठी खास 2 वर्ष वयोमर्यादा वाढवली आहे. तरी या संधीचा भावी पोलिसांनी नक्की लाभ घ्यावा.

भरतीसाठी शैक्षणिक पात्रता काय असेल ?

पोलीस भरती 2022 साठी शैक्षणिक पात्रतेमध्ये उमेदवार 12वी पास असावा किंवा समतुल्य/समकक्ष इतर परीक्षा पास असणे. कॉन्स्टेबल ड्रायव्हर पदासाठी उमेदवाराकडे ड्रायव्हिंग लायसन्स असणे आवश्यक आहे. शारिरीक चाचणी आणि लेखी परीक्षा घेऊन निवड प्रक्रिया पार पडणार आहे. जिल्हानिहाय पदसंख्या आणि इतर बाबी अधिकृत संकेस्थळावर अपडेट केले जात आहेत.

ऑनलाईन अर्ज करण्याची वेबसाईट कधी सुरू होईल ?

दिनांक 09-नोव्हेंबर-2022 पासून ऑनलाईन अर्ज करण्याची वेबसाईट सुरू होईल. मग ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. ऑनलाईन पद्धतीने अर्ज करताना वरील महत्वाची सूचना लक्षात ठेवावी.

खाली दिलेल्या लिंकवर/फोटोवर क्लिक करून करून मेगाभरती व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा अन मिळवा सरकारी आणि खाजगी नोकरीचे मोफत अपडेट्स डेली अपडेट्स तेही अगदी वेळेवर.

Logo वर क्लिक करून आपला व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा.

इतर महत्त्वाच्या भरती..

रायगड मध्ये पोलीस कॉन्स्टेबल पदांसाठी भरती सुरू ✓

नागपूर मध्ये पोलीस कॉन्स्टेबल पदांसाठी भरती सुरू ✓

अहमदनगर मध्ये पोलीस कॉन्स्टेबल पदांसाठी भरती सुरू ✓

ठाणे ग्रामीण पोलीस कॉन्स्टेबल पदांसाठी भरती सुरू ✓