Daily UpdatePolice Bharti 2024

Police BhartI Book List 2024 ; महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी बेस्ट पुस्तके पहा!

Police BhartI Book List 2024

Police BhartI Book List 2024 : आगामी 17,471 पोलीस भरतीसाठी लवकरच अर्ज प्रक्रिया सुरू होणार असल्याचे गृहविभगाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. या पोलीस भरतीसाठी तयारी करणारा वर्ग मोठा आहे. तसेच अनेकजण पहिल्यांदा या पोलीस भरती मध्ये आपली छाप पाडण्यासाठी तयारी करत आहेत. मेगाभरती पोर्टल ने आपल्यासाठी तासंतास ऑनलाईन रिसर्च करून स्पर्धा परीक्षा- पोलीस भरती क्षेत्रातील मार्गदर्शकांचे अनुभव तसेच याआधी सिलेक्शन झालेल्या पोलिसांच्या मनात बसलेल्या पुस्तकांची लिस्ट तयार केली आहे. खाली Best Book List for Police Bharti 2024 दिलेली आहे.

Maharashtra Police Bharti book List

Maharashtra Police Bharti Book List 2024 in Marathi | बेस्ट पोलीस भरती बुक लिस्ट २०२४

या आर्टिकल मध्ये पोलीस भरतीसाठी सर्व विषयाच्या पुस्तकांची यादी देत आहोत. खाली Police Bharti Book List in Marathi सुचावताना पुस्तकाची थोडक्यात ओळख करून देत आहोत. याचा फायदा नवीन भरती करणाऱ्या भावी पोलिसांना होईल. तसेच तुम्हाला हवे असलेले पुस्तक इकडे तिकडे शोधत फिरण्याची अजिबात गरज नाही. पुस्तक यादी सोबतच पुस्तकांची लिंक सुध्दा आपल्यासाठी उपलब्ध करून देत आहोत. जेणेकरून घरबसल्या पुस्तक आपल्याला मागवता येईल. खाली दिलेली Best Police BhartI Book List 2024 वाचून तुम्ही आगामी पोलीस भरतीत नक्कीच घवघवीत यश मिळवणार याची मेगाभरती ला खात्री आहे.

[Marathi] Maharashtra Police Bharti Best Books For- Marathi | महाराष्ट्र पोलीस भरती सर्वोत्तम पुस्तके – मराठी

मराठी विषयासाठी अनेक लेखकांचे पुस्तके आपल्याला मार्केट मध्ये मिळून जातील. परंतु महत्त्वाचे आणि परिपूर्ण मराठी व्याकरण साठी खाली दिलेले दोन पुस्तके बेस्ट आहेत. या दोन पैकी कोणते पुस्तक घावे असा प्रश्न तुम्हाला पडू शकतो. दोन्ही पैकी कोणतेही पुस्तक घ्या परंतु सखोल अभ्यास करा. मराठी व्याकरणातील महत्त्वाच्या बाबी समजून घ्या. प्रत्येक भरतीत प्रश्न येणाऱ्या कवी लेखक त्यांची पुस्तके या महत्वाच्या टॉपिकचे पाठांतर करा. खाली दिलेली पुस्तके स्पर्धा परीक्षा करणाऱ्या कित्येक तरुणांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी उपयोगी पडले आहेत.

  • 1. परिपूर्ण मराठी व्याकरण – बाळासाहेब शिंदे

•पोलीस भरतीसाठी बाळासाहेब शिंदे सरांचे हे पुस्तक बेस्ट आहे. अख्ख्या महाराष्ट्रात लोकप्रिय ठरलेले एकमेव पुस्तक आहे.

•पुस्तकांत एखाद्या टॉपिक वर विविध प्रकारे विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांची भरपूर उदाहरणे दिली आहेत. यामुळे सर्व टॉपिक एकदम क्लिअर होतात.

•पुस्तकाची मांडणी सुटसुटीत आहे. यामुळे वाचताना चांगला अनुभव येतो व गोष्टी लक्षात ठेवण्यास मदत होते.

•स्पर्धा परीक्षांकरिता बाळासाहेब शिंदे सरांचे हे पुस्तक प्रमाण मानले जाते. यानंतर मो रा वाळिंबे सरांचे पुस्तक महत्वाचे आहे. ते खाली दिलेले आहे.

  • 2. सुगम मराठी व्याकरण व लेखन – मो. रा. वाळिंबे

•हे पुस्तक सुध्दा खूप चांगले आहे. मांडणी सुद्धा सुटसुटीत केलेली आहे.

•बाळासाहेब शिंदे आणि मो. रा. वाळिंबे यांच्या वरील दोन्ही पुस्तकांचा सखोल अभ्यास केला तर याच्या बाहेरचा प्रश्न येतंच नाही.

•परंतु पोलीस भरतीसाठी यापैकी कोणतेही एक पुस्तक पुरेसे आहे.

•वरील पुस्तकांची लिंक खाली देत आहोत. जेणेकरून आपल्याला घरबसल्या पुस्तक मागवता येईल.

विषय – मराठी लेखक
परिपूर्ण मराठी व्याकरणबाळासाहेब शिंदे
सुगम मराठी व्याकरण व लेखनमो. रा. वाळिंबे

[Mathematics] Maharashtra Best Police Bharti Books For- Mathematics | महाराष्ट्र पोलीस भरती सर्वोत्तम पुस्तके – अंकगणित

गणित विषयासाठी सुध्दा मार्केट मध्ये अनेक पुस्तके उपलब्ध आहेत. परंतु पोलीस भरतीसाठी उपयुक्त दोन पुस्तके खाली देत आहोत. यापैकी कोणतेही एक पुस्तक वाचू शकता. उमेदवारांनी एक गोष्ट लक्षात घेणे गरजेचे आहे की गणित हा विषय केवळ वाचून नाही तर सरावाने लक्षात राहतो. त्यामुळे खाली दिलेल्या पुस्तकांतील महत्वाच्या टॉपिक चा भरपूर सराव करा. आगामी पोलीस भरतीत नक्कीच फायदा होईल.

  • 1. मॅजिक ऑफ मॅथेमॅटिक्स (कोकिळा) – नितीन महाले

•गणित विषयासाठी नितीन महाले सरांचे हे पुस्तक बेस्ट मानले जाते.

•महत्त्वाच्या टॉपिक वर अनेक उदाहरणे पुस्तकात दिलेली आहेत.

•सोप्या पद्धतीने मांडणी केली आहे. त्यामुळे नव्याने तयारी करणाऱ्या उमेदवारांना सुध्दा सर्व बाबी सहज कळतील.

•स्पर्धा परीक्षा- पोलीस भरती क्षेत्रातील मार्गदर्शक व यशस्वी विद्यार्थी हे पुस्तक आवर्जून सुचवतात.

  • 2. Fastrack Math – सतीश वसे

•सतीश वसे सरांचे Fastrack Math पुस्तक महाराष्ट्रात खूप लोकप्रिय आहे.

•स्पर्धा परीक्षा करणारे उमेदवार व मार्गदर्शक हे पुस्तक आवर्जून सुचवतात.

•बेसिक पासून सरळ सोप्या पद्धतीने माहिती दिलेली आहे.

•वरील पुस्तकांची लिंक खाली देत आहोत. जेणेकरून आपल्याला घरबसल्या पुस्तक मागवता येईल.

विषय – गणितलेखक
मॅजिक ऑफ मॅथेमॅटिक्स (कोकिळा) नितीन महाले
2. Fastrack Math सतीश वसे

[Buddhimatta] – Maharashtra Police Bharti Books For- Buddhimatta | महाराष्ट्र पोलीस भरती सर्वोत्तम पुस्तके – बुद्धिमत्ता

बुद्धिमत्ता चाचणी हा विषय मार्क्स मिळवण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. सातत्याने अभ्यास केल्यास व भरपूर सराव केल्यास बुद्धिमत्तेचा एकही मार्क जात नाही. खाली बुद्धिमत्ता या विषयासाठी बेस्ट पुस्तके सुचवत आहोत. नक्की अभ्यासा याचा आगामी भरतीत नक्कीच फायदा होईल.

  • 1. Fastrack Buddhimatta – सतीश वसे

•महाराष्ट्रात लोकप्रिय ठरलेले पुस्तक आहे.

•प्रश्नांची मांडणी आवश्यक आकृत्यांसह सुटसुटीत केलेली आहे.

•ट्रिक्स नुसार विविध उदाहरणे कशी सोडवावी याची माहिती.

  • 2. संपूर्ण बुद्धिमत्ता चाचणी – विठ्ठल राऊतवार

•सरावासाठी पुस्तकात सोडवलेले प्रश्न दिले आहेत.

•पुस्तकाची सोप्या पद्धतीने मांडणी केलेली आहे.

•विविध ट्रिक्स नुसार क्षणात उत्तर कसे काढायचे याची माहिती.

  • 3. स्पेशल पोलीस भरती अंकगणित व बुध्दीमत्ता – सचिन ढवळे

•सर्व स्पर्धा परीक्षा करिता उपयुक्त असे पुस्तक. विशेष करून आगामी पोलीस भरतीसाठी अत्यंत उपयुक्त गणित व बुद्धिमत्ता दोन्ही विषय एकाच पुस्तकात समाविष्ट आहेत.

•आगामी मेगा पोलीस भरती परीक्षा पातळी लक्षात घेऊन बनविलेले नवीन पुस्तक आहे.

•सचिन ढवळे सरांच्या सहज सोप्या पद्धतीने गणित सोडविण्याच्या ट्रिक्स यात दिलेल्या आहेत.

•जर तुम्ही सचिन ढवळे सरांचे ऑनलाईन क्लास करत असाल तर तुम्हाला पुस्तक समजण्यास अधिक सोपे जाईल. तसेच डिस्काउंट देखील मिळेल.

•वरील पुस्तकांची लिंक खाली देत आहोत. जेणेकरून आपल्याला घरबसल्या पुस्तक मागवता येईल.

विषय – बुद्धिमत्तालेखक
Fastrack Buddhimatta सतीश वसे
संपूर्ण बुद्धिमत्ता चाचणीविठ्ठल राऊतवार
स्पेशल पोलीस भरती अंकगणित व बुध्दीमत्तासचिन ढवळे

[Gk & Current affairs] Maharashtra Police Bharti Best Books For- Gk & Current affairs| महाराष्ट्र पोलीस भरती सर्वोत्तम पुस्तके – सामान्य ज्ञान & चालू घडामोडी

सामान्य ज्ञान & चालू घडामोडी साठी अनेक पुस्तके वेळोवेळी प्रकाशित होत असतात. तुम्हाला ट्रेंडिंग मध्ये असलेले पुस्तक वाचायचे आहे. ज्यामध्ये मागील वर्षापासून सध्या पर्यंत सर्व गोष्टी समाविष्ट असतील.

  • तात्यांचा ठोकळा (पोलीस भरती) – एकनाथ पाटील

•सामान्य ज्ञान & चालू घडामोडी विषयासाठी परिपूर्ण असे एकमेव पुस्तक.

•सदर पुस्तकाची नवीन आवृत्ती अजून प्रकाशित झालेली नाहीये. त्यामुळे भरतीसाठी एक दोन महिने शिल्लक असताना ट्रेंडिंग ठोकळा मागवू शकता. नवीन आवृत्ती प्रकाशित झाल्यावर खाली दिलेल्या तक्त्यातील लिंक अपडेट केली जाईल. तोपर्यंत सरावासाठी उपलब्ध असलेले पुस्तक वाचू शकता.

•लक्षात असूद्या केवळ चालू घडमोडीं या विषयावरील प्रश्नसंख्या पुस्तकात वाढत असते. बाकी सगळं सेम राहतं. त्यामुळे जे उपलब्ध आहे त्याचा पूर्ण अभ्यास करा.

•वरील पुस्तकाची लिंक खाली देत आहोत. जेणेकरून आपल्याला घरबसल्या पुस्तक मागवता येईल.

विषय – सामान्य ज्ञान & चालू घडामोडीलेखक
तात्यांचा ठोकळा (पोलीस भरती)एकनाथ पाटील

[Guide Books] Police Bharti Best Guide Books – महाराष्ट्र पोलीस भरती मार्गदर्शक पुस्तके

पोलीस भरतीत यश मिळवायचे असल्यास विविध प्रश्नांचा सराव करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. तसेच नवीन पद्धतीने विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांचा अधिक सराव करणे गरजेचे आहे. एकदा पॅटर्न समजला की कोणतीही परीक्षा क्रॅक करणे सोपे जाते. मेगाभरती सदर पुस्तकांचे कुठल्याही प्रकारचे प्रमोशन अजिबात करत नाही परंतु नवीन भरती करणाऱ्या उमेदवारांना पोलीस भरतीत नेमके काय विचारले जाते याचा अंदाज यावा यासाठी हे पुस्तक आवर्जून सुचवत आहे.

  • वर्दीचा राजमार्ग (संपूर्ण पोलीस भरती मार्गदर्शक) – विठ्ठल बडे

•आगामी भरतीसाठी अत्यंत उपयुक्त असे मार्गदर्शक पुस्तक.

•सुटसुटीत मांडणी मुळे बेस्ट सेलर ठरलेले पुस्तक.

•नवीन पॅटर्न नुसार एकमेव मार्गदर्शक पुस्तक.

•पोलीस भरती करणाऱ्या प्रत्येकाने हे पुस्तक वाचलेच पाहिजे.

•वरील पुस्तकाची लिंक खाली देत आहोत. जेणेकरून आपल्याला घरबसल्या पुस्तक मागवता येईल.

विषय – संपूर्ण पोलीस भरती मार्गदर्शकलेखक
वर्दीचा राजमार्ग विठ्ठल बडे
  • Errorless 44,000+ प्रश्नांचा अभ्यास मार्गदर्शक – विठ्ठल बडे

•नवीन पॅटर्न नुसार विविध प्रश्नांचा समावेश केलेला आहे. तसेच मागील भरतीतीत विचारल्या गेलेल्या ४४,०००+ प्रश्नांचा समावेश.

•नेमकी दिशा आणि आगामी परीक्षेत येणाऱ्या प्रश्नांचा अंदाज घेण्यासाठी उपयुक्त असे पुस्तक.

•२०२४ पर्यंत चालू घडामोडींवर आधारित प्रश्न व माहिती.

•तज्ज्ञांकडून प्रश्नांचे घटनानिहाय दर्जेदार विश्लेषण केलेले आहे.

•पोलीस भरती करणाऱ्या प्रत्येकाने हे पुस्तक वाचलेच पाहिजे.

•वरील पुस्तकाची लिंक खाली देत आहोत. जेणेकरून आपल्याला घरबसल्या पुस्तक मागवता येईल.

विषय – All in one (प्रश्नांचा सराव)लेखक
Errorless 44,000+ प्रश्नांचा अभ्यास
(भाग – 1)

_____________________________
Errorless 44,000+ प्रश्नांचा अभ्यास
(भाग -2)
विठ्ठल बडे
____
विठ्ठल बडे
FAQ ; Police BhartI Book List 2024 Maharashtra | महाराष्ट्र पोलीस भरती बुक लिस्ट २०२४

•मेगाभरती ने एका विषयाची दोन- तीन पुस्तके सुचवली आहेत त्यांपैकी नेमके कोणते वाचावे.

•कोणतेही एक पोलीस भरतीसाठी पुरेसे आहे. सदर पुस्तकांची व्याप्ती खूप मोठी आहे. तुमच्याकडे भरपूर वेळ असल्यास दोन्ही तिन्ही पुस्तके अभ्यासू शकता. ही पुस्तके केवळ पोलीस भरतीसाठीच नव्हे तर सर्व स्पर्धा परीक्षा करिता उपयुक्त आहेत.

•मी पहिल्यांदा भरती देणार आहे नेमके कोणते पुस्तके वाचू?

जर तुम्ही पहिल्यांदा भरती देणार असाल तर शेवटी दिलेली दोन पुस्तके आधी वाचा. मेगाभरती सदर पुस्तकांचे कुठल्याही प्रकारचे प्रमोशन अजिबात करत नाही परंतु नवीन भरती करणाऱ्या उमेदवारांना पोलीस भरतीत नेमके काय विचारले जाते याचा अंदाज यावा यासाठी हे पुस्तक आवर्जून सुचवत आहे.

•माझ्याकडे या लिस्ट मध्ये नसलेले पुस्तक आहे काय करू?

तुमच्याकडे जे पुस्तक उपलब्ध आहे. त्यातून अभ्यास करा वर दिलेले पुस्तके आमच्या रिसर्च मधून बेस्ट आहेत. याचा अर्थ असा नाही की इतर पुस्तके काहीच कामाची नाहीत. जे आहेत त्यातून सखोल अभ्यास करा.

सदर आर्टिकल मध्ये आपण पाहिले Maharashtra Police BhartI Book List 2024 तसेच त्याबद्दल थोडक्यात माहिती. शेवटी दिलेले पोलीस भरती मार्गदर्शक पुस्तके नक्की वाचा. मेगाभरती टीम ला खात्री आहे की तुम्हाला माहिती आवडली असेल. सदर आर्टिकल महत्त्वाचा वाटल्यास पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या आपल्या मित्रांना नक्की शेयर करा.

तसेच मेगा पोलीस भरती पुस्तकांसंदर्भात काही प्रश्न असतील तर खाली दिलेल्या लिंकवर वर क्लिक करून ऍडमिनला मॅसेज स्वरूपात विचारू शकता MegaBharti व्हॉट्सॲप/ टेलिग्राम ग्रुप/ चॅनल जॉईन करा अन मिळवा सरकारी आणि खाजगी नोकरीचे मोफत अपडेट्स तेही अगदी वेळेवर. गुगलवर Megabharti.in सर्च करून लेटेस्ट भरती अपडेट्स मिळवू शकता 🔎

Join Police Bharti Group
Join Now🟠
Join us on WhatsApp
Join Now🟢
Join us on Telegram
Join Now🔵
इतर महत्वाचे..

आयडीबीआय बँकेत 500+ जागांची भरती 🔔

लेटेस्ट मेगा पोलीस भरती अभ्यासक्रम pdf 🔔

भारतीय सैन्य दलात “अग्निवीर” मेगाभरती 🔔

महावितरण मध्ये 5000+ जागांची मेगाभरती 🔔

एमपीएससी पोलीस उपनिरीक्षक अभ्यासक्रम 🔔

🎓𝙍𝙚𝙡𝙞𝙖𝙗𝙡𝙚 𝙅𝙤𝙗 𝙐𝙥𝙙𝙖𝙩𝙚𝙨 म्हणजे 𝙈𝙚𝙜𝙖𝘽𝙝𝙖𝙧𝙩𝙞.𝙞𝙣 🔎