Daily UpdatePolice Bharti

Maharashtra Police Bharti Syllabus 2024 pdf | पोलीस भरती लेटेस्ट अभ्यासक्रम

Maharashtra Police Bharti Syllabus 2024

Maharashtra Police Bharti Syllabus 2024 : मित्रांनो येत्या काही महिन्यात पोलीस भरती जाहिरात येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या आर्टिकल मध्ये आपण पाहणार आहोत महाराष्ट्र पोलीस भरती स्वरूप, अभ्यासक्रम, मैदानी चाचणी/ शारीरीक चाचणी विषयी सुध्दा सविस्तर पाहणार आहोत. चला तर पाहूया (Maharashtra Police Bharti Syllabus) आर्टिकल आवडल्यास भरतीची तयारी करणाऱ्या तुमच्या मित्र नातेवाईकांना शेयर करायला अजिबात विसरु नका..!

Maharashtra police Bharti syllabus in Marathi

Maharashtra Police Bharti Written Exam Pattern in Marathi | महाराष्ट्र पोलीस भरती लेखी परीक्षा स्वरूप

•महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल भरतीसाठी लेखी परीक्षा स्वरूप खालील तक्त्यात दिले आहे.

•पोलीस कॉन्स्टेबल लेखी परीक्षा साठी मराठी, सामान्य ज्ञान – चालू घडामोडी, बुद्धिमत्ता चाचणी तसेच अंकगणित हे मुख्य विषय असतील.

•लेखी परीक्षा ही वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाची असेल.

•तसेच लेखी परीक्षेमध्ये निगेटिव्ह मार्किंग नसते.

•उमेदवारांना लेखी परीक्षा साठी 90 मिनिटे एवढा कालावधी मिळेल.

•लेखी परीक्षा मराठी भाषेमध्येच होते. त्यामुळे उमेदवारांनी गोंधळून जाण्याचे कारण नाही.

विषयप्रश्न संख्यागुण संख्या
गणित2525
बुद्धिमत्ता/ बौद्धिक चाचणी 2525
सामान्य ज्ञान -चालू घडामोडी 2525
मराठी (व्याकरण)2525
एकूण गुण100100

Maharashtra Police Bharti Physical Test Pattern in Marathi | महाराष्ट्र पोलीस भरती मैदानी/ शारीरिक चाचणी स्वरूप

•महाराष्ट्र पोलीस भरती मैदानी/ शारीरिक चाचणी स्वरूप खालील तक्त्यात दिले आहे.

•पोलीस कॉन्स्टेबल मैदानी/ शारीरिक चाचणी साठी धावणे आणि गोळाफेक हे इव्हेंट असतील.

Physical Test (शारीरिक चाचणी)Male (पुरुष)
1600 मिटर धावणे30 गुण
गोळाफेक20 गुण
एकूण गुण 50 गुण
Physical Test (शारीरिक चाचणी)Female (महिला)
800 मिटर धावणे30 गुण
गोळाफेक20 गुण
एकूण गुण 50 गुण

Police Bharti Selection Process | पोलीस भरती निवड प्रक्रिया

•लेखी परीक्षा

•कागदपत्रे पडताळणी

•शारीरीक/ मैदानी चाचणी

लेखी परीक्षा उत्तीर्ण झालेले उमेदवार शारीरिक चाचणी साठी पात्र ठरतात. कधी कधी शारीरिक चाचणी आधी घेतली जाऊ शकते. अश्या प्रकारे पोलीस भरती निवड प्रक्रिया पार पडते.

Maharashtra Police Bharti Syllabus in Marathi | महाराष्ट्र पोलीस भरती लेटेस्ट अभ्यासक्रम

विषयतपशीलवार अभ्यासक्रम
गणितसंख्या व संख्याचे प्रकार, बेरीज, वजाबाकी, गुणाकार भागाकार (पदावली), कसोट्या, पूर्णांक व त्याचे प्रकार, लसावी-मसावी, वर्ग व वर्गमूळ, घन व घनमुळ, सरासरी, नफा तोटा, काळ काम वेग, शेकडेवारी, गुणोत्तर प्रमाण, सरलव्याज व चक्रवाढ व्याज, वयवारी, भूमिती संकल्पना, परिणामे.
बुद्धिमत्ता/ बौद्धिक चाचणीसंख्या मालिका (वेगळा घटक, पुढील संख्या), अक्षर मालिका (वेगळा घटक, पुढील अक्षर), नातेसंबंध (विविध प्रकार), तर्क व अनुमान, कालमापन (कॅलेंडर), रांगेतील स्थान, सांकेतिक भाषा, वेगळा घटक ओळखणे, विधाने योग्य अनुमान, आरशातील प्रतिमा ओळखणे, पाण्यातील प्रतिबिंब शोधणे, घड्याळ, दिशा (दिशा ओळखणे), बौद्धिक क्षमता पाहण्यासाठी आकलन पर आधारित प्रश्न.
सामान्य ज्ञान -चालू घडामोडीमहाराष्ट्र भूगोल (Imp), भारताचा भूगोल, महाराष्ट्र इतिहास -समाजसुधारक (Imp), भारताचा इतिहास, राज्यघटना (Imp), पंचायतराज (Imp), योजना, सामान्य ज्ञान प्रश्न पुरस्कार, महत्त्वाच्या चालू घडामोडी.
मराठी (व्याकरण)मराठी, वर्णमाला, समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, शब्दसमुहाबद्दल एक शब्द, अलंकारिक शब्द, समुहदर्षक शब्द, ध्वनीदर्शक शब्द, वाक्प्रचार, म्हणी, प्रयोग, समास, काळ, लिंग, वचन, संधी, नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियाविशेषण, क्रियापद, मराठी पुस्तके व त्यांचे लेखक (Imp)

वरील तक्त्यात पोलीस भरती अभ्यासक्रम सविस्तर/ तपशीलवार दिलेला आहे. उमेदवारांनी एक गोष्ट लक्षात घेणे आवश्यक आहे. पोलिस भरतीच्या प्रत्येक पेपर मध्ये यातील काही टॉपिक वर प्रश्न येतात. उमेदवारांनी सर्व टॉपिक अभ्यासल्यास भविष्यात होणाऱ्या इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी सुध्दा नक्की फायदा होईल.

Police Bharti syllabus in Marathi pdf | पोलीस भरती अभ्यासक्रम PDF @Megabharti.in

वर दिलेल्या तक्त्यातील महत्त्वाचा अभ्यासक्रम PDF स्वरूपात देत आहोत. जेणेकरून उमेदवारांना त्याचा फायदा होईल. खाली दिलेल्या Maharashtra Police Bharti Syllabus pdf मधील महत्वाचे टॉपिक उमेदवाराने कवर केले तर पोलीस भरती लेखी परीक्षेमध्ये नक्कीच यश मिळेल.

पोलीस भरती अभ्यासक्रम pdf
येथे पहा अभ्यासक्रम pdf 📑
Homepage -होमपेज
लेटेस्ट भरती अपडेट्स पहा 🟠
FAQ : Maharashtra Police Bharti | महाराष्ट्र पोलीस भरती प्रश्नांची उत्तरे

•महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल भरतीसाठी शैक्षणिक पात्रता काय आहे?

पोलीस कॉन्स्टेबल भरतीसाठी उमेदवार 12वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

•पोलीस कॉन्स्टेबल पदासाठी वेतनमान (पगार) किती असते?

पोलीस कॉन्स्टेबल पदासाठी वेतनमान ₹21,700 ते 69,100 असते.

•पोलीस कॉन्स्टेबल भरतीसाठी उंची किती असावी लागते?

सध्या मिळत असलेल्या माहितीनुसार पोलीस कॉन्स्टेबल भरतीसाठी पुरुष उमेदवारांसाठी 165 सेमी व महिला उमेदवारांसाठी 155 सेमी असावी लागते. यामध्ये प्रवर्गानुसार थोडाफार बदल होऊ शकतो.

•पोलीस कॉन्स्टेबल भरतीसाठी छाती किती सेमी लागते?

पोलीस कॉन्स्टेबल भरतीसाठी छाती 79-84 सेमी लागते.

•महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल भरती वयोमर्यादा काय आहे?

महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल भरतीसाठी किमान 18 वर्षे व कमाल 28 वर्षे अशी वयोमर्यादा आहे.

Conclusion – निष्कर्ष : मित्रांनो या आर्टिकल मध्ये आपण पाहिले की पोलीस भरती स्वरूप अभ्यासक्रम, मैदानी चाचणी, तुमच्या मनातील प्रश्न इत्यादी Police Bharti Syllabus pdf in Marathi pdf आपल्याला Megabharti.in टेलिग्राम चॅनेल वर सुद्धा मिळून जाईल. मेगाभरती टीम आशा करते की ही माहिती आपल्याला नक्कीच उपयोगी पडेल.

तसेच आणखी काही प्रश्न असतील तर खाली दिलेल्या लिंकवर वर क्लिक करून विचारू शकता MegaBharti व्हॉट्सॲप/ टेलिग्राम ग्रुप जॉईन करा अन मिळवा सरकारी आणि खाजगी नोकरीचे मोफत अपडेट्स तेही अगदी वेळेवर. गुगलवर Megabharti.in सर्च करून दररोज लेटेस्ट भरती अपडेट मिळवू शकता 🔎

Join us on WhatsApp
लगेच जॉईन करा 🟢
Join us on Telegram
लगेच जॉईन करा 🔵
इतर महत्वाचे…

लेटेस्ट ग्रामसेवक भरती अभ्यासक्रम pdf 🔔

MPSC PSI अभ्यासक्रम pdf इन मराठी 🔔

तलाठी भरती अभ्यासक्रम pdf | प्रश्नपत्रिका 🔔

भारतीय नौदलात 362 जागांची मेगाभरती 🔔

10वी पास महाराष्ट्र शासन “शिपाई” भरती 🔔

भारतीय नियंत्रक 1770+ जागांची मेगाभरती 🔔

🎓𝙍𝙚𝙡𝙞𝙖𝙗𝙡𝙚 𝙅𝙤𝙗 𝙐𝙥𝙙𝙖𝙩𝙚𝙨 म्हणजे 𝙈𝙚𝙜𝙖𝘽𝙝𝙖𝙧𝙩𝙞.𝙞𝙣 🔎