Daily UpdateMega BhartiPolice Bharti 2024

पोलीस मेगाभरती ऑनलाईन अर्ज करण्याची तारीख जाहीर

Maharashtra Police Bharti 2022

Maharashtra Police Bharti 2022 : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक अत्यंत महत्त्वाची घोषणा केली होती. महाराष्ट्रात 18,000 पोलीस भरतीची जाहिरात येत्या आठवड्यात काढण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले होते. त्यानंतर आता मिळत असलेल्या माहितीनुसार दि. 03-नोव्हेंबर-2022 पासून ऑनलाइन अर्ज सुरू होणार आहेत. आणि 30-नोव्हेंबर-2022 ला बंद होणार आहेत.
Maharashtra Police Bharti 2022

18,000 पोलीस भरतीची अधिकृत जाहिरात अजून आलेली नाही.पण लवकरच प्रसिद्ध करण्यात येणार आहे. त्यामुळे तयारी करणाऱ्या आणि वाट पाहणाऱ्या तमाम भावी पोलिसांसाठी ही आनंदाची बातमी आहे.

आधी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नंतर पालकमंत्री यांनी पोलीस भरती बाबत घोषणा केली होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संबंधित विभागाला पत्र दिली होती. त्यानंतर आता मिळत असलेल्या माहितीनुसार लवकरच जीआर प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

पोलीस मेगाभरती साठी ऑनलाईन अर्ज कधी सुरू होणार ?
 • आता मिळत असलेल्या माहितीनुसार दि.03-नोव्हेंबर-2022 पासून ऑनलाईन अर्ज करण्याची सुरुवात होणार आहे.
 • ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 30-नोव्हेंबर-2022 असणार आहे.
 • Total Post (एकूण जागा) :
 • 18,000 पेक्षा जास्त जागा
 • Post Name (पदाचे नाव) :
 • पोलीस शिपाई, पोलीस शिपाई चालक
 • Educational qualification (शैक्षणिक पात्रता) :
 • 12वी पास (Refer PDF)
 • Age Limit (वयोमर्यादा) :
 • 18 ते 28 वर्षापर्यंत
 • मागासवर्गीय साठी 5 वर्ष सूट
 • Job Location (नोकरी स्थान) :
 • संपूर्ण महाराष्ट्रभर (कुठेही)
 • Application Mode (अर्ज माध्यम) :
 • ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहेत.
 • Download PDF (जाहिरात पहा) :
 • Official Website (अधिकृत संकेतस्थळ) :

कोरोना मुळे दीड-दोन वर्ष कोणत्याही भरत्या होऊ शकल्या नाहीत. त्यानंतर जवळपास 11,000 पोलिस भरतीचा जीआर काढण्यात आला होता, परंतु काही कारणास्तव भरती रद्द झाली. मात्र आता भरतीचा मार्ग मोकळा झाला आहे. पोलीस भरतीची वर्षानुवर्षे तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी हि खूप आनंदाची अपडेट आहे. भरती प्रक्रिया संदर्भात अजून काही नवीन अपडेट्स आल्या तर आम्ही आपल्यापर्यंत सर्वात आधी पोहोचवण्याचा प्रयत्न करू. अधिकृत जाहिरातीची प्रतीक्षा सर्व उमेदवार करत आहेत.

खाली दिलेल्या लिंकवर/फोटोवर क्लिक करून करून मेगाभरती व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा अन मिळवा सरकारी आणि खाजगी नोकरीचे मोफत अपडेट्स डेली अपडेट्स तेही अगदी वेळेवर.

Logo वर क्लिक करून आपला व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा.

बापरे..! जिल्हा परिषदेत सुद्धा आहेत 13,000 पेक्षा जास्त रिक्त जागा ✓