जिल्हा परिषद भरती 13,551 पदे रिक्त
Jilha Parishad Bharti 2023
Jilha Parishad Bharti 2023 : मागील तीन वर्षांपासून जिल्हा परिषद भरती ला काही मुहूर्त सापडला नाही. घोषणा झाल्या मात्र प्रत्यक्षात भरती झालीच नाही. उमेदवार संताप व्यक्त करत आहेत. मेहनती उमेदवार भरतीची किती आतुरतेने वाट पाहत आहेत याची जाणीव आजच्या व्यवस्थेला होणे गरजेचे आहे. फक्त सत्ता आपलीशी करणे म्हणजे जग जिंकणे नव्हे ; तर इथल्या प्रत्येक घटकाचा विकास म्हणजे जग जिंकणे होय ! असे मत एका सामान्य उमेदवारचे आहे.
आधी अर्ज केलेल्या उमेदवारांची फिस परत देण्यात येणार आहे. आणि ग्रामविकास विभागाने हे सांगितले आहे की जानेवारी 2023 मध्ये नवीन जिल्हा परिषद भरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात येईल.
त्यामूळे तयारी करणाऱ्या उमेदवारांमध्ये एक आनंदाचं वातावरण निर्माण झाले आहे.

- ग्रामविकास विभागाने काय केले ?
- महाराष्ट्र राज्याच्या ग्रामविकास विभागाने जिल्हा परिषदांना आदेश दिला आहे. भरतीबाबत सविस्तर तपशील सादर केला आहे. मंजुरी मिळाली की लगेच भरती प्रक्रिया सुरू होईल.
- भरती कशी राबवली जाणार ?
- ही भरती सुद्धा आधीसारखीच जिल्हा परिषद पातळीवर राबवली जाईल.
- किती संवर्गातील पदे भरणार?
- एकूण पाच संवर्गातील पदे भरण्यास जिल्हा परिषदने परवानगी दिली आहे.
- तयारी करणाऱ्या उमेदवारांचे काय मत आहे ?
- जिल्हा परीषद भरती तीन वर्षांपासून रखडली आहे. त्यामुळे गरजू आणि होतकरू तरुण उमेदवार संतापून गेले आहेत.
- या आधी अर्ज केलेली फीस सरकारने वापरली आणि उमेदवारांना तसेच वाऱ्यावर सोडले असे मत आहे.
- अर्ज शुल्क सुद्धा तिप्पट घेतले गेले होते मात्र भरती ढकला धकली करत आहेत.
- लवकर भरती जाहिरात काढावी आमच्या सहनशक्तीचा अंत पाहू नये असं मत उमेदवारांचे आहे.
- किती पदे भरली जाणार आहेत?
- 13,551 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
- भरतीसाठी किती अर्ज आले होते ?
- या भरतीसाठी 20 लाखाहून अधिक अर्ज आले होते.
- भरती प्रक्रिया कधी सुरू होईल ?
- शैक्षणिक पात्रता ?
- वयोमर्यादा ?
- पदांची नावे ?
अश्या अनेक प्रश्नांची उत्तरे जाहिरात प्रसिद्ध झाल्यावर आपल्याला मिळतील. भरती संबधीत पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळवण्यासाठी आपला व्हॉट्सॲप ग्रुप नक्की जॉईन करा. कारण करिअर सर्वात महत्वाचं आहे !
खाली दिलेल्या लिंकवर/फोटोवर क्लिक करून करून मेगाभरती व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा अन मिळवा सरकारी आणि खाजगी नोकरीचे मोफत अपडेट्स डेली अपडेट्स तेही अगदी वेळेवर.
