Daily UpdateMega Bharti

बापरे ! भारतीय डाक विभागात 98,093 जागांसाठी होणार भरती

Indian Post Recuirment 2022 |

| Dak Vibhag Bharti 2022-23 |

Indian Post Recuirment 2022 : भारतीय डाक विभागात तब्बल 98,093 जागांची भरती होणार आहे. पोस्ट ऑफिस यांच्या अधिसूचनेनुसार 98,093 जागांची मेगाभरती होणार असल्याचे कळते आहे. डाक विभागात नोकरीची सुवर्णसंधी आता उमेदवारांना मिळणार आहे. 10वी पास 12वी पास असलेले उमेदवार डाक विभाग भरतीची आतुरतेने वाट पाहत असतात. खास त्यांच्यासाठी ही अपडेट अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. लवकरच अधिकृत जाहिरात प्रसिद्ध होणार आहे.

Indian Post Recuirment 2022
 • डाक विभाग भरती 2022-23 अंतर्गत देशात एकूण किती जागा भरण्यात येणार आहेत ?
 • पूर्ण भारतात एकूण 98,093 जागा भरण्यात येणार आहेत.
 • डाक विभाग भरती 2022-23 अंतर्गत महाराष्ट्रात किती जागा भरण्यात येणार आहेत ?
 • महाराष्ट्रात जवळपास एकूण 15,509 जागा भरण्यात येणार आहेत.
 • कोणत्या पदासाठी किती जागा आहेत ?
 • पोस्टमन – 9884 जागा
 • मेलगार्ड – 147 जागा
 • मल्टीटास्किंग स्टाफ – 5478 जागा
 • पात्रता काय असणार आहे ?
 • पात्रता फक्त मान्यता प्राप्त बोर्डतून 10वी आणि 12वी पास असणार आहे. त्यामुळे राज्यातील अनेक उमेदवार या मेगा भरतीची आतुरतेने वाट पाहत आहेत.
 • संबधित पदासाठी निवड झाल्यास किती पगार मिळणार ?
 • पोस्टमन – बेसिक पगार – 15,000 ते 22,400 Rs
 • मेलगार्ड – बेसिक पगार – 21,700 Rs
 • मल्टीटास्किंग स्टाफ – बेसिक पगार – 18,000 Rs
 • भरती प्रक्रिया कधी सुरू होईल ?
 • मेगा भरतीची जाहिरात लवकरच प्रसिद्ध होईल. भरतीची नवीन अपडेट आली की आम्ही सर्वात आधी आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू.
पोस्ट ऑफिस भरतीकडे तमाम उमेदवारांचे लक्ष लागले आहे. कारण हीच एक अशी भरती आहे ; ज्यामध्ये शैक्षणिक पात्रता खूप मोठी नसते. आणि पदांचा दर्जा ही चांगला असतो. याआधी झालेल्या भरतीमध्ये मेरिट लिस्ट नुसार निवड करण्यात आली होती. पण यावेळी मुलाखत किंवा ऑनलाईन टेस्ट घेण्यात येईल असेही सूत्रांकडून कळते आहे.

पोस्ट ऑफिस भरती 2022-23 प्रक्रिया संदर्भात अजून काही नवीन अपडेट्स आल्या तर आम्ही आपल्यापर्यंत सर्वात आधी पोहोचवण्याचा प्रयत्न करू. नवीन अधिकृत जाहिरातीची प्रतीक्षा राज्यातील सर्व इच्छुक करत आहेत.

खाली दिलेल्या लिंकवर/फोटोवर क्लिक करून करून मेगाभरती व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा अन मिळवा सरकारी आणि खाजगी नोकरीचे मोफत अपडेट्स डेली अपडेट्स तेही अगदी वेळेवर.

Logo वर क्लिक करून आपला व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा.

इतर महत्त्वाच्या भरती..

मेगा पोलीस भरतीसाठी लवकरच सुरुवात सरकारचा ग्रीन सिग्नल मिळाला ✓

मुंबई मध्ये डेटा एन्ट्री ऑपरेटर पदासाठी भरती प्रक्रिया सुरू ✓

SSC GD कॉन्स्टेबल पदाच्या 24,000 जागांसाठी भरती लवकर अर्ज करा ✓

वेस्टर्न कोलफील्ड मध्ये भरती सुरू ✓