भारताचे हे लोकप्रिय क्रिकेटर्स करतात सरकारी नोकरी ! | Indian Cricketers Government Jobs
Indian Cricketers Government Jobs
Indian Cricketers Government Jobs : मित्रांनो या आर्टिकल मध्ये आपण पाहणार आहोत भारताचे काही लोकप्रिय क्रिकेटर्स जे क्रिकेट सोबतच सरकारी नोकरी सुध्दा करतात. पाहुयात की कोणते असे खेळाडू आहेत ज्यांना संबंधित क्षेत्रातील विशेष प्राविण्य मिळवल्या बद्दल खास सरकारी नोकरीची ऑफर आली आणि त्यांनी ती स्वीकारली सुध्दा. तर चला पाहुयात काही टॉप खेळाडू आणि त्यांच्या पदाबद्दल..

MS Dhoni – महेंद्रसिंग धोनी : लेफ्टनंट कर्नल
आपल्या कुल अंदाजाने पूर्ण जगभरात एक वेगळी ओळख निर्माण करणारा भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी भारतीय सैन्य दलात लेफ्टनंट कर्नल या पदावर कार्यरत आहे. त्याच्या विशेष कामगिरीबद्दल भारतीय सैन्याने त्याला ही पदवी देऊन त्याचा सन्मान केला आहे. तो सध्या IPL मध्ये चेन्नई सुपर किंग्ज टीमचा कर्णधार आहे. 2023 चे IPL धोनीचे शेवटचे IPL असेल असे असे बोलले जात आहे.
KL RAHUL – केएल राहुल : असिस्टंट मॅनेजर
भारताचा स्टार क्रिकेटर केएल राहुल ला भारतीय रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नर यांनी असिस्टंट मॅनेजर पदाची ऑफर दिली. राहुल सध्या भारतीय संघाचा एक भाग असल्याने तो सध्यातरी नोकरी करू शकत नाही. पण त्याने ही ऑफर स्वीकारली आहे. यंदा 2023 च्या IPL मध्ये राहुल लखनऊ सुपर जाईंट्स चा कर्णधार व सलामी फलंदाज म्हणून खेळताना दिसणार आहे.
Yuzi Chahal – युजवेंद्र चहल : इनकम टॅक्स ऑफिसर
भारतीय क्रिकेट संघाचा महत्त्वपूर्ण लेग स्पिनर युजवेंद्र चहल इनकम टॅक्स डिपार्टमेंट मध्ये एक ऑफिसर म्हणून नोकरी करतो. सध्या तो भारतीय संघाचा भाग असल्याने क्रिकेटला प्राधान्य देत आहे. यंदा 2023 च्या IPL मध्ये चहल राजस्थान रॉयल्स कडून खेळताना दिसेल.
Harbhajan Singh – हरभजन सिंग : पोलीस उपअधीक्षक
भारतीय क्रिकेट संघाचा एक महत्त्वपूर्ण स्पिनर हरभजन सिंग ला विशेष कामिगरी बद्दल पंजाब पोलीस कडून पोलीस उपअधीक्षक पदाची ऑफर आली. त्याने ती स्वीकारली पोलीस उपअधीक्षक हे पद पोलीस विभागातील खूप महत्त्वाचे आणि मानाचे पद मानले जाते. तसेच यंदा हरभजन IPL 2023 मध्ये समालोचन करताना दिसणार आहे.
Kapil Dev – कपिल देव : आर्मी ऑफिसर
भारतीय क्रिकेट संघाचा अत्यंत हुशार आणि सय्यमी माजी कर्णधार म्हणजे कपिल देव त्याने त्याच्या कारकर्दीत फक्त कर्णधार म्हणूनच नाही तर एक उत्कृष्ठ ऑल राऊंडर म्हणून महत्वाचे योगदान दिले. त्याच्या या विशेष कामगिरीबद्दल भारतीय सैन्य दलाने प्रथमच लेफ्टनंट कर्नल पदाची ऑफर दिली. आणि कपिल देव ने सुध्दा ती स्वीकारली. कपिल देव पहिला असा खेळाडू आहे ज्याला भारतीय सैन्य दलामध्ये नोकरीची एक मोठी संधी मिळाली.
या पोस्ट मध्ये महेंद्रसिंग धोनी असा एकमेव खेळाडू आहे. ज्याने क्रिकेटर होण्याआधी एका रेल्वे स्टेशन वर तिकीट कलेक्टर म्हणून नोकरी केलेली आहे.
Conclusion : या पोस्ट मध्ये आपण पाहिले भारताचे काही लोकप्रिय क्रिकेटर्स जे करतात Cricketers Government Jobs सरकारी नोकरी भारतात कोणत्याही क्षेत्रात विशेष कामगिरी केली तर त्या खेळाडूला/ व्यक्तीला सन्मान म्हणून मोठ्या सरकारी नोकरीची ऑफर दिली जाते. अनेक खेळाडू/ व्यक्ती ऑफर स्वीकारतात आणि देशसेवा करतात.
तसेच खाली दिलेल्या लिंकवर वर क्लिक करून करून MegaBharti व्हॉट्सॲप/ टेलिग्राम ग्रुप जॉईन करा अन मिळवा सरकारी आणि खाजगी नोकरीचे मोफत अपडेट्स तेही अगदी वेळेवर.
Join us on WhatsApp |
लगेच सामील व्हा 🟢 |
Join us on Telegram |
लगेच सामील व्हा 🔵 |
Homepage -होम पेज |
येथे क्लिक करा ✅ |
इतर महत्वाचे..
महाराष्ट्र क्रिकेट संघात “या” पदाची भरती 🔔
भारतीय रिझर्व्ह बँक ड्रायव्हर पदांची भरती 🔔
EPFO अंतर्गत 2859 जागांची मेगाभरती 🔔
CRPF कॉन्स्टेबल 9212 जागांची भरती 🔔
मुंबई उच्च न्यायालयात शिपाई हमाल भरती 🔔