Daily UpdateResult

Forest Guard Result 2023 Soon..🔔 | वनरक्षक भरती निकाल लवकरच..!

Forest Guard Result 2023

Forest Guard Result 2023 : महाराष्ट्र वन विभाग अंतर्गत विविध पद भरतीची जाहिरात जून महिन्यात प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यानुसार 10 जून पासून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले. अंतिम तारखेपर्यंत वनरक्षक पदासाठी जवळपास साडे चार लाख अर्ज आले. वनरक्षक पदांची उपलब्धता केवळ 2138 इतकीच आहे. दिनांक 31 जुलै पासून वनविभागाच्या विविध पदांची ऑनलाईन पद्धतीने परीक्षा झाली. परीक्षा टीसीएस कंपनी मार्फत घेण्यात आली. आता परीक्षा झाल्यावर प्रत्येक उमेदवाराच्या मनात एकच प्रश्न आहे. तो म्हणजे (Maharashtra Forest Guard Result 2023) वनरक्षक भरती परिक्षेचा निकाल कधी लागणार आहे? तर या आर्टिकल मध्ये पाहुयात वनरक्षक लेखी (ऑनलाईन) परीक्षेचा निकाल कधी पर्यंत लागू शकतो; तसेच निकाल लागल्यास सर्वात आधी आपल्याच मेगाभरती पोर्टल वर PDF📑 किंवा लिंक 🖇️ उपलब्ध करून दिली जाईल. त्यामुळे Megabharti.in 🔎 ला वेळोवेळी भेट देत रहा.

Maharashtra Forest Guard Result 2023

Maharashtra Forest Guard Result 2023 | वनरक्षक परीक्षा निकाल उशीर का लागतोय?

वनरक्षक ऑनलाईन परीक्षा टीसीएस घेत असल्याने सर्व उमेदवारांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले. टीसीएस कंपनी परीक्षा झाल्यापासून 3-4 दिवसाच्या आत रिस्पॉन्स शीट उपलब्ध करून देते. वनरक्षक परिक्षेचा निकाल सुध्दा याच प्रकारे लवकरच लागेल असे वाटत होते, परंतु जसे जसे वनरक्षक पेपर होत गेले पेपर फुटी संबंधी अनेक तक्रारी ठीक ठिकाणी आल्या. बऱ्याच ठिकाणी पेपर सुरू असताना सेंटरवर गोंधळ पाहायला मिळाला. वन विभागामार्फत संबंधितांवर कडक कारवाई गेली जाणार आहे. त्यामुळे वन विभागामार्फत चौकशी साठी समिती नेमण्यात आली आहे. याच कारणाने वनरक्षक परीक्षा निकालाला उशीर लागत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे वनरक्षक परीक्षा निकाल कधीपर्यंत लागेल हे निश्चित सांगता येणार नाही. संबंधितांवर कारवाई करून पुढील भरती प्रक्रिया लवकर सुरू करण्याची जबाबदारी वन विभागावर असेल. वनरक्षक निकालासंबंशी कुठलीही अपडेट आली तर सर्वात आधी Megabharti.in मार्फत आपल्या पर्यंत पोहोचवली जाईल.

वनरक्षक भरती परीक्षा निकाल Link/ PDF
येथे पहा वनरक्षक निकाल ✅
________________________________________
[निकाल लागल्यास लगेच अपडेट केले जाईल.]

Forest Guard Result 2023 Maharashtra | वनरक्षक भरती परीक्षा निकाल 2023

महाराष्ट्र वन विभाग अंतर्गत रिक्त पदांची जाहिरात आली. त्यानंतर पुढील भरती प्रक्रिया वेगाने सुरू झाली. 31 जुलै पासून सुरू झालेल्या ऑनलाईन परीक्षा आता पूर्ण झाल्या आहेत. वनरक्षक पदाचा शेवटचा पेपर 11 ऑगस्ट रोजी झाला. त्यानंतर सर्व उमेदवारांच्या मनात एकच प्रश्न आहे की वनरक्षक लेखी (ऑनलाईन) परीक्षेचा निकाल कधी पर्यंत लागू शकतो? तर मित्रांनो वनरक्षक भरती परीक्षा प्रक्रिया पुर्ण झाली आहे. आता एका आठवड्याचा आत रिस्पॉन्स शीट उपलब्ध होतील. त्यामध्ये तुम्ही दिलेले उत्तरे आणि टीसीएस चे उत्तरे असतील. त्यानुसार तुम्ही तुमचा स्कोर जाणून घेऊ शकता. तसेही एकदा रिस्पॉन्स शीट उपलब्ध झाली की लगेच पाठोपाठ अंतिम निकाल लागतो. टीसीएस कंपनी परीक्षा प्रक्रिया खूप जलद गतीने पार पाडते. त्यामुळे निकाल लवकरच लागण्याची शक्यता आहे.

Forest Guard Result Date Maharashtra | वनरक्षक भरती निकाल तारीख

महाराष्ट्र वनरक्षक भरती लेखी (ऑनलाईन) परीक्षेचा निकाल लवकरच लागण्याची शक्यता आहे. वनरक्षक लेखी (ऑनलाईन) परीक्षेचा निकाल सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्याच्या आत लागू शकतो. ऑनलाईन परीक्षेचा निकाल लागल्यास लगेच ग्राउंड प्रक्रिया सुरू होईल. ज्या उमेदवारांना 45% म्हणजेच 54+ गुण मिळतील असे उमेदवार ग्राउंड साठी पात्र असतील. त्यांची 5किमी अंतर धाव चाचणी घेतली जाईल. आणि अंतिम निवड यादी प्रसिद्ध केली जाईल. वन विभाग परीक्षेच्या निकालावर मेगाभरती टीम लक्ष ठेऊन आहे. वन विभाग परीक्षेच्या निकालाची लिंक 🖇️ किंवा PDF 📑 उमेदवारांना सर्वात आधी Megabharti.in या आपल्या विश्वसनीय पोर्टल वर उपलब्ध करून देणार आहोत.

Forest Guard Bharti Result Official Website | महाफोरेस्ट भरती अधिकृत संकेतस्थळ

महाराष्ट्र वन विभाग अंतर्गत एकूण 2417 रिक्त पदांची भरती प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात आली आहे. वन विभागाची परीक्षा TCS जरी घेत असले तरी परिक्षेचे तसेच ग्राउंडचे अपडेट हे महाफॉरेस्ट देत आहे. महाफोरेस्ट या अधिकृत वेबसाईटवर आपल्याला जाहिराती पासून इतर सर्व महत्वाची माहिती मिळत आली आहे. खाली या अधिकृत वेबसाईटची लिंक देत आहोत जेणेकरून आपणास यापुढे देखील भरती संबंधी सर्व अपडेट्स मिळत राहतील.

Official Website -अधिकृत संकेतस्थळ
येथे क्लिक करा ✅
भरती संबंधी अधिक माहिती
येथे क्लिक करा ✅