Daily Update

(NEET UG) नीट परीक्षा 2023 अत्यंत महत्वाची माहिती मराठी

Details NEET UG 2023

Details NEET UG 2023 : या आर्टिकल मध्ये आपण पाहणार आहोत राष्ट्रीय पात्रता सह प्रवेश प्रक्रिया परीक्षा 2023 (NEET) ची अत्यंत महत्वाची माहिती. जर तुम्ही ही परीक्षा देणार असाल किंवा भविष्यात देण्याचा विचार करत असाल तर ही माहिती नक्की उपयोगी पडेल.

NEET EXAM information In Marathi

NEET Exam Information In Marathi – नीट परीक्षा माहिती मराठी 2023

दरवर्षी लाखो विद्यार्थी NEET परीक्षा देतात. डॉक्टर होण्याचे स्वप्न पूर्ण करायचे असल्यास NEET परीक्षेला पर्याय नाही. त्यामळे अनेकजण तासंतास परीक्षेचा अभ्यास करताना दिसतात. डॉक्टर होण्याचं क्रेझ प्रत्येक तरुण मुलामुलींना असतं. एक चांगलं Government कॉलेज मिळावं असं प्रत्येक NEET परीक्षा देणाऱ्याला वाटत असतं. पण प्रत्यक्षात खूप कमी जण या परीक्षेत यशस्वी होतात. ही परीक्षा दरवर्षी घेतली जाते. NEET (UG-PG) ही ऑल इंडिया लेवल ची परीक्षा आहे. या वर्षीचे Notification नुकतेच जाहीर झाले आहे.

Full Form Of NEET – NEET चे विस्तारित रूप

Full Form Of NEET – NATIONAL ELIGIBILITY CUM ENTRANCE TEST असे आहे. NEET परीक्षा दोन पद्धतीची असते. एक UG म्हणजेच Under Graduate आणि PG म्हणजेच Post Graduate असे यांचे विस्तारित स्वरूप आहे.

Syllabus NEET Exam 2023 In Marathi – नीट परीक्षेचा अभ्यासक्रम

नीट परिक्षेत फिजिक्स केमिस्ट्री आणि बायोलॉजी हे विषय असतात. दरवर्षी हाच अभ्यासक्रम असतो काहीही बदल होत नाही. छोटासा बदल होऊ शकतो म्हणजे एखादा टॉपिक वगैरे पण मूळ अभ्यासक्रम आणि मूळ विषय हेच आहेत. खाली Neet Syllabus Pdf देत आहोत. जेणेकरून नेमका अभ्यासक्रम कळेल आणि अभ्यास करण्यासाठी सोपे जाईल.

Neet syllabus pdf – नीट परीक्षा अभ्यासक्रम
येथे पहा अभ्यासक्रम pdf ☑️

Which Language Is NEET Exam Conducted? – नीट परीक्षा कोणकोणत्या भाषेत घेतली जाते?

राष्ट्रीय पात्रता सह प्रवेश प्रक्रिया परीक्षा (NEET) ही एकूण 13 भाषेमध्ये घेतली जाते. ज्यामध्ये इंग्रजी, हिंदी, मराठी, असामी, बंगाली, गुजराती, कन्नड, मल्याळम, ओडिया, पंजाबी, तमिळ, तेलुगू आणि उर्दू भाषा समाविष्ट आहेत. यामधील इंग्रजी भाषा जास्त प्रचलित आहे.

NEET परीक्षा बहुपर्यायी स्वरूपाची असते का?

होय, NEET परीक्षेत वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाचे प्रश्न विचारले जातात. चार पर्यायापैकी योग्य पर्याय उत्तरपत्रिकेत गोल करायचा असतो. NEET परीक्षेत एकूण 200 प्रश्न असतात. 200 प्रश्न सोडवण्यासाठी 200 मिनिटे वेळ दिला जातो. ही परीक्षा National Testing Agency (NTA) द्वारे घेतली जाते.

नीट परीक्षा 2023 चे Notification नुकतेच जाहीर झाले आहे. त्यामुळे Apply कसा करायचा? याची माहिती खाली देत आहोत. त्यांनतर काही प्रश्न आणि त्यांची उत्तरे पाहूया जे सारखे विचारले जातात.

Exam Name – परीक्षेचे नाव
NEET (UG) 2023
Educational Qualification -शैक्षणिक पात्रता
12वी पास
(फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी & बायोटेक्नॉलॉजी)
Age Limit -वयोमर्यादा
किमान 17 वर्षे
Fees -फी
General – ₹1700
EWS/OBC -₹1600
SC/ST/PWD/Third Gender – ₹1000
Application Mode -अर्ज पद्धत
ऑनलाईन
Duration of Exam -परीक्षेचा कालावधी
200 मिनिटे (3 तास 20 मिनिटे)
Timing of Exam -परीक्षेची वेळ
02:00 PM to 5:20 PM
[भारतीय प्रमाण वेळेनुसार]
Last date of application -अर्ज करण्याची शेवटची तारीख
06-एप्रिल-2023 आहे.
Date of Examination -परीक्षा तारीख
07-मे-2023 आहे. (रविवार)
View Notification Adv -जाहिरात पहा
येथे पहा जाहिरात PDF ✅
Official Website -अधिकृत संकेतस्थळ
येथे क्लिक करा ✅
Online Apply -ऑनलाईन अर्ज
Apply करा ✅
FAQ : NEET Exam Marathi

प्रश्न.1) नीट परीक्षा कधीपासून सुरू झाली?

➡️ नीट परीक्षा 2013 पासून सुरू झाली आहे.

प्रश्न.2) नीट परीक्षा वर्षात किती वेळा आयोजित केली जाते?

➡️ नीट परीक्षा वर्षातून केवळ एक वेळेस आयोजित केली जाते.

प्रश्न. 3) नीट परीक्षा कुणी द्यावी?

➡️ नीट परीक्षा त्यांनी अवश्य द्यावी ज्यांना वैद्यकीय क्षेत्रात आवड आहे. डॉक्टर किंवा अन्य वैद्यकीय अधिकारी बनायचे आहे.

प्रश्न. 4) नीट परीक्षा पास झाल्यास काय होते?

➡️ नीट परीक्षा पास झाल्यास तुम्हाला बेस्ट Government कॉलेज मध्ये प्रवेश मिळतो. तिथे तुम्ही आणखी चांगला अभ्यास करून डॉक्टर होऊ शकता. थोडक्यात नीट परीक्षा पास झाल्यास तुमचे भविष्य सुरक्षित आहे असे मानले जाते.

प्रश्न. 5) नीट परिक्षेत निगेटिव्ह मार्किंग असते का?

➡️ होय, नीट परिक्षेत निगेटिव्ह मार्किंग असते. उत्तर चुकले की त्याचे निगेटिव्ह मार्किंग केले जाते. आणि मार्क्स कट केले जातात.

प्रश्न.6) नीट परीक्षासाठी वयोमर्यादा काय असते?

➡️ नीट परीक्षासाठी किमान वय 17 वर्षे असणे आवश्यक आहे.

प्रश्न. 7) नीट परीक्षेची तयारी कशी करावी?

➡️ नीट परीक्षेची तयारी आपण विविध क्लासेस/ कोर्सेस लावून करू शकता.,किंवा ऑनलाईन यूट्यूब सारख्या मध्यामतून सुद्धा लेक्चर अटेंड करू शकता. तसेच सेल्फ स्टडी सुद्धा करू शकता.

प्रश्न . 8) नीट परीक्षा किती वेळा देता येते?

➡️ नीट परीक्षा देण्यासाठी प्रयत्नांचे (Attempt) कोणतेही लिमिट नाही.

Conclusion -निष्कर्ष : या आर्टिकल मध्ये आपण पाहिले की Neet Exam Information In Marathi परीक्षा नेमकी कशी असते. त्यातील महत्त्वाच्या बाबी आणि यंदाच्या NEET 2023 परीक्षा संबंधी महत्वाची माहिती. मेगाभरती टीम आशा करते की तुमच्या मनातील अनेक प्रश्नांचे उत्तरे या आर्टिकलच्या माध्यमातून मिळाली असतील. आणखी काही प्रश्न असतील तर मेगाभरती ग्रुप जॉईन करून विचारू शकता. नक्कीच सहकार्य केले जाईल.

तसेच खाली दिलेल्या लिंकवर वर क्लिक करून करून MegaBharti व्हॉट्सॲप/ टेलिग्राम ग्रुप जॉईन करा अन मिळवा सरकारी आणि खाजगी नोकरीचे मोफत अपडेट्स तेही अगदी वेळेवर.

Join us on WhatsApp
येथे क्लिक करा ✅
Join us on Telegram
येथे क्लिक करा ☑️
इतर महत्त्वाच्या भरती..

इंडिया पोस्ट ऑफीस 40889 जागांची भरती 🔔

एसटी महामंडळात नवीन 134 जागांची भरती 🔔

महाराष्ट्र वन विभाग मध्ये 127 जागांची भरती 🔔

🎓𝙍𝙚𝙡𝙞𝙖𝙗𝙡𝙚 𝙅𝙤𝙗 𝙐𝙥𝙙𝙖𝙩𝙚𝙨 म्हणजे 𝙈𝙚𝙜𝙖𝘽𝙝𝙖𝙧𝙩𝙞.𝙞𝙣 🔎