Daily UpdateMega Bharti

मोदीजी 75,000 हजार तरुणांना रोजगार देऊन दिवाळी गोड करणार

All India Job Fair 2022

All India Job Fair 2022 : भारतातील 75,000 हजार तरुणांना पंतप्रधान नरेंद्रजी मोदी रोजगार उपलब्ध करून देणार आहेत. देशात बेरोजगारीचा प्रश्न खूप मोठा होत चालला आहे. विरोधक या मुद्द्यावरून नेहमीच आक्रमक भूमिका घेत असतात. त्यामुळे PM मोदी तब्बल 75,000 हजार तरुणांना सरकारी कार्यालयात आणि मंत्रालयातील विविध पदांवर नियुक्त करणार आहेत.

PM मोदी यांच्या कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार पंतप्रधान 22-ऑक्टोबर-2022 रोजी देशातील तमाम तरुणांशी ऑनलाईन पद्धतीने संवाद साधणार आहेत. त्याच दिवशी रोजगार मेळावा आयोजित करण्यात येणार आहे. 2023 पर्यंत 10 लाख बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे आश्वासन देण्यात आले आहे.

All India Job Fair 2022
  • कधी होणार हा मोठा रोजगार मेळावा ?
  • PM मोदी यांच्या कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार ‘पंतप्रधान 22-ऑक्टोबर-2022 रोजी देशातील तमाम तरुणांशी ऑनलाईन पद्धतीने संवाद साधणार आहेत’. त्याच दिवशी रोजगार मेळावा आयोजित करण्यात येणार आहे.
  • किती बेरोजगार तरुणांना मिळणार सरकारी नोकरी ?
  • देशातील एकूण 75,000 हजार बेरोजगार तरुणांची दिवाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी गोड करणार असल्याचे आश्वासन देण्यात आले आहे.
  • सरकारी नोकरी मिळेल की खाजगी ?
  • रोजगार मेळावा भारत सरकार द्वारा घेतला जात असल्याने नोकरी ही सरकारीच असणार आहे.
  • कोणती पदे भरणार आहेत ?
  • या मोठ्या मेळाव्यात 38 मंत्रालये आणि संबधित खात्यामधले गट-अ गट-ब गट-क अशी पदे भरण्यात येणार आहेत.
  • हवालदार, सहायक, आयकर निरीक्षक, संरक्षण दल, निरीक्षक आदी पदे भरली जाणार आहेत.

देशातील वाढत्या बेरोजगारीवरून काँग्रेस नेते राहुल गांधी आणि इतर विरोधक पंतप्रधान नरेंद्र मोदींना टार्गेट करत होते. त्यामुळे मोदी हा मोठा निर्णय घेणार असल्याचे कळते आहे.

All India Job Fair 2022 : एकंदरीत हा मेळावा खास होणार असल्याचे दिसत आहे. महाराष्ट्रातील बेरोजगारीची समस्या कायम खूप मोठी राहिलेली आहे. इतर राज्यांची पण काही वेगळी परिस्थिती नाही. झपाट्याने वाढत चाललेली लोकसंख्या भारतीय चलनात होत असलेली घसरण अन देशातील तरुण बेरोजगार हे फार दयनीय वास्तव आहे.

अश्या साऱ्या परिस्थिती मध्ये एक दिलासा मिळाला आहे. 2023 पर्यंत 10 लाख बेरोजगारांना रोजगाराची संधी देणार असे सांगितले जात आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तब्बल 75,000 हजार बेरोजगार तरुणांना रोजगार दिला तर नक्कीच त्यांची दिवाळी ही गोड होईल.

खाली दिलेल्या लिंकवर/फोटोवर क्लिक करून करून मेगाभरती व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा अन मिळवा सरकारी आणि खाजगी नोकरीचे मोफत अपडेट्स डेली अपडेट्स तेही अगदी वेळेवर.

Logo वर क्लिक करून आपला व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा

सिक्युरीटी गार्ड सरळ भरती ही आहे तारीख ✓