Daily Update

10वी चे परीक्षा अर्ज भरण्यास झाली सुरूवात !

10th Exam 2022-2023

10th Exam 2022-2023 : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत मार्च 2023 मध्ये घेतल्या जाणाऱ्या 10वी बोर्ड परीक्षेचे परीक्षा अर्ज भरण्यास आज दिनांक 19-ऑक्टोबर-2022 पासून सुरुवात झाली आहे.

10th Exam 2022-2023

नियमित विद्यार्थी आजपासून ऑनलाईन अर्ज भरू शकतात. विद्यार्थांना परीक्षा अर्ज 10 नोव्हेंबर पर्यंत भरता येणार आहेत. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी ही माहिती दिली आहे. 10वी चे परीक्षा अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरायचे असल्याने विद्यार्थांच्या आधार कार्ड वरच्या चुका वगैरे इत्यादी बाबी अपडेट करणे आवश्यक आहे, त्यामुळे मंडळाने अर्ज करण्यासाठी जास्त वेळ दिला आहे.

परीक्षा अर्ज हे ऑनलाईन पद्धतीने भरायचे असले तरी ते शाळेमार्फतच भरण्यात येतील विद्यार्थ्यांनी वयक्तिक काहीही करायचे नाहीये. आवश्यक डॉक्युमेंट्स शाळा मागेल तेव्हा ते देणे बंधनकारक असेल.

दहावी परीक्षा फॉर्म भरताना बऱ्याचश्या तांत्रिक अडचणी येत असल्यामुळे फॉर्म भरण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली असून विद्यार्थांना आता 26 डिसेंबर पर्यंत फॉर्म भरता येणार आहेत.तसेच जे विद्यार्थी काही कारणास्तव 26 डिसेंबर पर्यंत फॉर्म भरू शकले नाहीत अशा विद्यार्थ्यांसाठी विलंब शुल्क देऊन 1 जानेवारी पर्यंत फॉर्म भरता येणार आहेत.

राज्यातील तमाम विद्यार्थांना माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने आवाहन केले आहे की 10वी बोर्ड परीक्षेचे फॉर्म ऑनलाईन पद्धतीने भरायचे आहेत त्यामुळे सर्वांनी आपल्या माध्यमिक शाळांद्वारे ते भरावेत.ज्या विद्यार्थांचे अद्यापही आधार अपडेट नसेल त्यांनी लवकरात लवकर अपडेट करून घावे. जे विद्यार्थी Intermediate ड्रॉइंग ग्रेड परीक्षेला बसले होते त्यांनी फॉर्म भरताना ग्रेड प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे जेणेकरून काही अतिरिक्त गुण मिळतील.

ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरण्यासाठी महाराष्ट्र राज्य बोर्ड परीक्षेच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी.

Official Website (अधिकृत संकेतस्थळ) :

इथे क्लिक करा ✓

तरी राज्यातल्या 10वी च्या सर्व विद्यार्थ्यांनी वेळेत अर्ज भरावेत आणि मार्च 2023 च्या बोर्ड परीक्षेला बसून घवघवीत यश संपादन करावे.

खाली दिलेल्या लिंकवर/फोटोवर क्लिक करून करून मेगाभरती व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा अन मिळवा सरकारी आणि खाजगी नोकरीचे मोफत अपडेट्स डेली अपडेट्स तेही अगदी वेळेवर.

Logo वर क्लिक करून आपला व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा .

SBI बँकेत नोकरीची सुवर्ण संधी तब्बल 1422 पदासाठी भरती ✓

प्रयत्न करत राहणे महत्त्वाचे असते कारण यश मिळणे न मिळणे हे आपल्या प्रयत्नावर अवलंबून असते.