10th-12th विद्यार्थांसाठी महत्त्वाची अपडेट | Question Bank | Exam Time Table डाऊनलोड करा
10th Board Exam Details 2023
10th Board Exam Details 2023 : दहावी बारावीच्या विद्यार्थांसाठी महत्त्वाची अपडेट आली आहे. यंदा परीक्षा कॉपी मुक्त व्हाव्या यासाठी बोर्डाकडून कडक निर्णय घेतले जात आहेत. 10वी च्या परीक्षा 2 मार्च पासून तर 12वी च्या परीक्षा 21 फेब्रुवारी पासून सुरू होत आहेत. या पोस्टमध्ये आपण महत्त्वाचे निर्णय, परीक्षा वेळापत्रक आणि प्रश्नपेढी (Question Bank) पाहणार आहोत.

सर्वात आधी पाहुयात 10th 12th Board Exam 2023 चे महत्त्वाचे बदल/निर्णय.
10th 12th Board Exam 2023 Rules
•आपल्या सर्वांना माहितच आहे की कोरोना काळात विद्यार्थांना काही प्रमाणात सूट देण्यात आली होती. जसे की अर्धा तास अतिरिक्त वेळ आणि थोडे मोकळे वातावरण जेणेकरून विद्यार्थांना अधिक मानसिक ताण होऊ नये., पण यंदा कोरोना चे परिणाम विद्यार्थ्यावर झाले नाहीत. विद्यार्थी नियमित शाळा कॉलेज मध्ये जाऊ शकले आहेत. अभ्यासक्रम पूर्ण करू शकले आहेत. त्यासाठी अतिरिक्त अर्धा तास वेळ कमी करण्यात आला आहे. हा खूप महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.
•उमेदवाराने परीक्षेचा पेपर चोरल्यास विकत घेतल्यास किंवा विकल्यास परीक्षा रद्द करण्यात येईल आणि पुढील पाच परीक्षेसाठी निलंबन करण्यात येणार आहे.
•उमेदवाराने परीक्षेदरम्यान मोबाईल किंवा इतर इलेक्ट्रोनिक्स वस्तू जवळ बाळगली किंवा पेपर शेयर करण्याचा प्रयत्न केला तर तरीही निलंबन करण्यात येणार आहे. सोबतच संबंधित उमेदवारावर फौजदारी गुन्हा दाखल केला जाणार आहे.
•अधिकृत उत्तरपत्रिका, पुरवणी, आलेख यांसारख्या गोष्टींचा अनधिकृत वापर केल्यास सुद्धा संबंधित उमेदवार परीक्षेसाठी अपात्र ठरवला जाईल.
•इलेक्ट्रॉनिक उपकरणे वापरणे, उत्तरपत्रिकेत धमकी, अपशब्द, सीट नंबर, फोन नंबर किंवा संपर्क साधण्यासाठी विनंती केलेले मजकूर लिहिल्यास सुद्धा उमेदवार परीक्षेसाठी अपात्र ठरवला जाईल.
•परीक्षा केंद्रात हत्यारे/शस्त्र बाळगणे परीक्षा कर्मचाऱ्यांवर दबाव आणण्याचा प्रयत्न केल्यास सुद्धा संबंधित उमेदवार परीक्षेसाठी अपात्र ठरवला जाईल आणि पुढील कडक कारवाई साठी तो स्वतः जबाबदार असेल.
•परीक्षा सुरू असताना परिक्षकाशी आणि इतर परिक्षार्थ्याशी विनाकारण काहीही बोलणे वाद घालने. एकमेकांना उत्तरपत्रिका दाखवणे. असे केल्यास सुद्धा उमेदवार परीक्षेसाठी अपात्र ठरवला जाईल.
*विद्यार्थांना पेपर जमा करण्यासाठी आधी 10 मिनिटे अतिरिक्त दिले जात होते., परंतु यंदा बोर्डाने ते अतिरिक्त 10 मिनिटे न देण्याचा निर्णय घेतला. पण पालकांच्या आणि विद्यार्थांच्या निवेदनामुळे बोर्डाने ते अतिरिक्त 10 मिनिटांचा कालावधी यंदा ही दिला जाईल असे स्पष्ट केले आहे.
तरी 10वी आणि 12वी विद्यार्थ्यांनी आपले लक्ष फक्त अभ्यासावर देणे आवश्यक आहे. परीक्षा केंद्रात अत्यंत काळजीपूर्वक वर्तन करावे.
SSC-HSC Board Exam Time Table 2023
अनेकदा विद्यार्थांना कोणता पेपर कधी आहे हेच कळत नाही. त्यांच्याकडे हॉल तिकीट उपलब्ध असते पण तरीही काही विद्यार्थी ऐनवेळी गोंधळून जातात त्यासाठी खाली दिलेले वेळापत्रक (Timetable) डाऊनलोड करून घ्या जेणेकरून तुम्हाला परीक्षेचा आराखडा लक्षात येईल.
SSC Board Exam Time Table 2023
इयत्ता 10वी चे परीक्षा वेळापत्रक ⬇️ |
SSC Board Exam Time Table 2023✅ |
HSC Board Exam Time Table 2023
इयत्ता 12वी चे परीक्षा वेळापत्रक ⬇️ |
HSC Board Exam Time Table 2023✅ |
10th Board Exam Question Bank 2023
यानंतर परीक्षेसंबंधी अत्यंत महत्त्वाची अपडेट ती म्हणजे 10वी 12वी विद्यार्थांसाठी प्रश्नपेढी (Question Bank) अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध झाल्या आहेत. विद्यार्थ्यांनी या प्रश्नपेढीचा सराव केल्यास परीक्षेत नक्कीच फायदा होईल. Question Bank डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
10th Board Question Bank 2023
इयत्ता 10वी प्रश्नपेढी लिंक ⬇️ |
10th Board Question Bank 2023✅ |
12th Board Question Bank 2023
इयत्ता 12वी प्रश्नपेढी लिंक ⬇️ |
12th Board Question Bank 2023✅ |
या प्रश्नपेढीचा (Question Bank) फायदा दरवर्षी विद्यार्थांना होत असतो कारण ह्या 10th-12th Question Bank PDF बोर्ड स्वतः उपलब्ध करून देत असते. जेणेकरून विद्यार्थांना सराव करण्यासाठी मदत होईल. 10वी/ 12वी मध्ये शिकत असलेल्या तुमच्या मित्रांना ही महत्त्वाची अपडेट नक्की शेयर करा. तसेच परिक्षेसंबधी इतर महत्त्वाचे अपडेट वेळेवर मिळवण्यासाठी MegaBharti.in ला भेट देत रहा 🔎
तसेच खाली दिलेल्या लिंकवर/Logo वर क्लिक करून करून MegaBharti व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा अन मिळवा सरकारी आणि खाजगी नोकरीचे मोफत अपडेट्स तेही अगदी वेळेवर.

इतर महत्त्वाच्या भरती..
स्टाफ सेलेक्शन मध्ये 12523 जागांची भरती ☑️
भारतीय डाक विभाग 2508 जागांची भरती ☑️
बँक ऑफ इंडिया मध्ये 500 जागांची भरती ☑️
आर्मी ऑर्डनन्स मध्ये 1793 जागांची भरती ☑️
MPSC मध्ये 7034 लिपीक पदांची भरती ☑️
UPSC अंतर्गत नवीन 74 जागांची भरती ☑️
स्पोर्ट्स अथॉरिटी मध्ये 152 जागांची भरती ☑️
MSRTC धुळे मध्ये नवीन 99 जागांची भरती ☑️